Posts

Showing posts from February, 2020

फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Image
फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी   फैजपूर प्रतिनिधी : बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ दिपाली चौधरी झोपे यांनी प्रतिमा पुजन करुन व शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक श्री अमोल निंबाळे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ, कॉंग्रेस चे ज्येष्ठ पदाधिकारी मुख्याध्यापक गणेश गुरव सर, मानवाधिकार फोरम जिल्हाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील,दिव्यांग सेना शहराध्यक्ष श्री नितिन महाजन,सौ.भारती पाटील,नंदु साळी,माजी सैनिक ज्ञानदेव चौधरी राजू काठोके, संदिप माळी, राकेश करोसिया,लखन चिरावंडे, देवेंद्र झोपे,पिंटू मंडवाले,पाचपोळ साहेब, संदिप सोनवणे,भाविल पाटील,पार्थ झोपे इ. विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेलं कार्य,ब...

दादासाहेब फाळके स्मृतिदिन 🙏🙏💐

Image
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन.त्यांनी कल्पकतेने भारतीय बनावटीच्या चित्रपटांचा पाया रचला.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.🙏🙏🙏🙏💐💐

राज्याला विकासासाठी केंद्राच्या मदतीची गरज, परंतु केंद्राची अद्याप कोणतीही मदत नाही-शरद पवार

Image
राज्याला विकासासाठी केंद्राच्या मदतीची गरज, परंतु केंद्राची अद्याप कोणतीही मदत नाही-शरद पवार जळगाव : राज्य सरकार ला विकासासाठी केंद्र सरकारने मदत करावयाची असते,परंतु केंद्र सरकारकडून राज्याला अजूनपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. याविषयीचा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करणार आहोत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.चोपडा येथे ते बोलत होते. चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हवा असलेला हमी भाव त्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता पडणार नाही. त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केंद्र शासनावर टीका करतांना ते म्हणाले, कि राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत केली पाहिजे मात्र केंद्र शासन कोणतीही मदत करीत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. या...

फैजपूर येथे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना महाराष्ट्र मित्र मंडळ तर्फे श्रद्धांजली

Image
फैजपूर येथे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना महाराष्ट्र मित्र मंडळ तर्फे श्रद्धांजली   प्रतिनिधी फैजपूर : गेल्या वर्षी जम्मु कश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यातील शहिदांना आज स्मृतीदिनानिमित्त फैजपूर येथील महाराष्ट्र मित्र मंडळ मोठी पाण्याची टाकी परिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतमोतेचे पुजन करण्यात आले,त्यानंतर दिवे पेटवून व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.श्री.अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर,सौ.महानंदा होले नगराध्यक्षा,श्री.निलेश राणे माजी नगराध्यक्ष, श्री.जे.डी.बंगाळे मंडळ अधिकारी,सौ.दिपाली चौधरी झोपे खान्देश नारीशक्ती अध्यक्षा, डॉ.भरत महाजन, श्री.संदिपभाऊ पाटील मानवाधिकार जिल्हाध्यक्ष,श्री.देवेंद्र झोपे यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच महिला व तरुण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सुत्रसंचालन श्री.गणेश गुरव सर मुख्याध्यापक यांनी केले.यशस्वीतेसाठी निरज झोपे, लोकेश कोल्हे,भरत कोल्हे,शाम चौधरी, निखील चौ...

Mikhandeshi.news

Image
Mikhandeshi.news मी खान्देशी.न्युज खान्देशी जनतेच्या न्याय हक्क सेवेसाठी परिपूर्ण डिजीटल व्यासपीठ.... संपर्क-9975405488 जय खान्देश...🙏💪✌️🥇🚩