राज्याला विकासासाठी केंद्राच्या मदतीची गरज, परंतु केंद्राची अद्याप कोणतीही मदत नाही-शरद पवार

राज्याला विकासासाठी केंद्राच्या मदतीची गरज, परंतु केंद्राची अद्याप कोणतीही मदत नाही-शरद पवार

जळगाव : राज्य सरकार ला विकासासाठी केंद्र सरकारने मदत करावयाची असते,परंतु केंद्र सरकारकडून राज्याला अजूनपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. याविषयीचा मुद्दा आपण संसदेत उपस्थित करणार आहोत. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.चोपडा येथे ते बोलत होते.

चोपडा येथील सहकारी सूतगिरणीचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री अरूणभाई गुजराथी,आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हवा असलेला हमी भाव त्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता पडणार नाही. त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
केंद्र शासनावर टीका करतांना ते म्हणाले, कि राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने मदत केली पाहिजे मात्र केंद्र शासन कोणतीही मदत करीत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत आपण संसदेत प्रश्‍न मांडणार आहोत. केंद्र शासनाच्या अर्थविषयक धोरणांवरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले देशाचे आर्थिक धोरण मजबूत करण्यासाठी उद्योग व व्यवसाय वाढ करण्याची गरज आहे.केंद्र सरकार त्याबाबत उदासिन असल्याचे मतही त्यानीं व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व