Posts

Showing posts from December, 2020

ओबीसी नेते स्व.गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त कपडे वाट

Image
ओबीसी नेते माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप व खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूर येथे कपडे व खाऊ वाटप फैजपूर प्रतिनिधी: भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व ओबीसी नेते स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे भारतीय जनता पार्टी व खान्देश नारीशक्ती गृप तर्फे लहान बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते झोपडपट्टी परीसरातील लहान बालकांना नवे कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.स्व.गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या सारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्यांनी भाजप चे विचार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचवून पक्षाची बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा होता असे प्रतिपादन नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी केले.स्व.गोपिनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच आज भाजपा पक्ष हा ओबीसींना जवळचा पक्ष वाटतो असे मत भाजप शहर सरचिटणीस संजय भावसार यांनी व्यक्त केले.झोपडीत राहणार्या बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करुन गरीबांच्या झोपडीत आनंद न...

खुशखबर..८० हजार बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या

Image
खुशखबर..८० हजार बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या खान्देशी न्युज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस आहे . त्यानिमित्त राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी, निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी दिली . तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवारपासून ‘महास्वयंम’ Mahaswayam पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी १२ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल , असे मलिक यांनी सांगितले. पवार यांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. त्यानिमित्त किमान काही बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची योजना राबिवण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही मलिक म्हणा...

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिपाली गृप्स तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान

Image
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा सन्मान दिपाली गृप्स चा स्तुत्य उपक्रम फैजपूर प्रतिनिधी: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फैजपूर येथील दिपाली गृप्स व दशामाता गृप तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला.०३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. दिव्यांग व्यक्तींना उपकाराची सहानभूती नको,मदतीची, सहकार्याची आणि विश्वासाची साथ हवी आहे.आज या दिनी आपण सर्वांनी दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना सक्षम करण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,पिंपरुड ग्रा.पं.सदस्या किरणताई कोल्हे,दिव्यांग सेना फैजपूर शहर अध्यक्ष नितीन महाजन,सौ.सुष्मा नितीन महाजन,तालुका अध्यक्ष नानाभाऊ मोची,ललित वाघुळदे,जितेंद्र मेढे, विनोद बिर्हाडे यांच्या सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी सर्व दिव्यांग बांधवांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.