जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिपाली गृप्स तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांचा सन्मान
दिपाली गृप्स चा स्तुत्य उपक्रम
फैजपूर प्रतिनिधी: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त फैजपूर येथील दिपाली गृप्स व दशामाता गृप तर्फे दिव्यांग बांधवांचा सन्मान करण्यात आला.०३ डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. दिव्यांग व्यक्तींना उपकाराची सहानभूती नको,मदतीची, सहकार्याची आणि विश्वासाची साथ हवी आहे.आज या दिनी आपण सर्वांनी दिव्यांग व्यक्तींना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना सक्षम करण्याचा संकल्प करूया असे प्रतिपादन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,पिंपरुड ग्रा.पं.सदस्या किरणताई कोल्हे,दिव्यांग सेना फैजपूर शहर अध्यक्ष नितीन महाजन,सौ.सुष्मा नितीन महाजन,तालुका अध्यक्ष नानाभाऊ मोची,ललित वाघुळदे,जितेंद्र मेढे, विनोद बिर्हाडे यांच्या सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.यावेळी सर्व दिव्यांग बांधवांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment