पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करा-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी
राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र.. PIC.TWITTER.COM/Q7PEO26NP5 — DEVENDRA FADNAVIS (@DEV_FADNAVIS) MAY 12, 2021 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहिलं असून त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याकडेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या सुमारे १२ राज्यांमध्ये प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील प...