भाजपा आ.मंगेश चव्हाण आणि शरद पवार यांची गुप्त भेट?? आ.चव्हाण म्हणाले मी आजपर्यंत पवारांच्या सावलीत देखील उभा राहिला नाही..
भाजपा आ.मंगेश चव्हाण आणि शरद पवार यांची गुप्त भेट?? आ.चव्हाण म्हणाले मी आजपर्यंत पवारांच्या सावलीत देखील उभा राहिला नाही.. खान्देश न्युज नेटवर्क: चाळीसगाव येथील भाजपाचे आक्रमक आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त धडकले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या.पण नेमकं खरं कारण समोर आले आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भेटीची जोरदार चर्चा रंगली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर खुलासा केला आहे. त्यांनी शरद पवारांशी भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच आजपर्यंत मी कधीही पवारांच्या सावलीत उभं राहिलो नाही. यापुढे देखील त्यांच्या सावलीत उभं राहण्याची वेळ येणार नाही, असं मत मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केलं. मंगेश चव्हाण म्हणाले, “आजवर मी दहा फुटावर देखील शरद पवारांच्या उभे राहिलो नाही. मी त्यांच्या सावल...