अपंग सेवा मंडळ मुक बधीर विद्यालय येथे जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला पर्यावरण सखी मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन उत्साहात साजरा

अपंग सेवा मंडळ मुक बधीर विद्यालय येथे जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व महिला पर्यावरण सखी मंच जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिन उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी: दिनांक 3 जानेवारी २०२२ रोजी सावित्री बाई फुले जयंती निमित्त जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी व महि.पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिन निमित्त अपंग सेवा मंडळ मूक बधीर विद्यालय जळगाव येथे मूकबधिर बालिका  पूर्वा ,स्नेहा,दिक्षा,आलिया, निलोफर,शिफा,आफरिन यांचे बालिका पूजन करण्यात आले. तसेच त्यासोबत त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. 
       यावेळी जायंटस ग्रुपच्या सौ राजकमल पाटील मॅम यांनी सावित्रीबाई फुले जीवन व कार्य यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी शे निशांत और जा ह्यांनी मूकबधिर विद्यार्थिनींना सांकेतिक भाषेत स्पष्ट करून सांगत होते. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील व प्रमुख पाहूणे समाज कल्याण विभागाचे अधिकारी भरत चौधरी यांनी देखील मनोगत मांडले. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील, राजकमल पाटील, विभावरी पाटील, नेहा जगताप, मनिषा एस पाटील, नूतन तासखेडकर, इंदिरा पाटील यांसह शिक्षक वृंद मुख्याध्यापक श्री एकनाथ पवार ,शिक्षिका निता सोमाणी,शे निशात अ रज्जाक,श्री हेमंत मुंदडा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व