गुरुपौर्णिमा : गुरू आणि शिष्याचे नाते जसे कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि द्रौपदी
आज गुरू पौर्णिमा.. गुरू पौर्णिमा म्हटलं की आपला गुरु बद्दल असलेला आदर व्यक्त करण्याचा दिवस. खरं तर आपल्या देशाला गुरुशिष्य परंपरेची खुप मोठी आणि पवित्र संस्कृती लाभलेली आहे. महाभारत काळात तर या गुरुशिष्य परंपरेची प्रत्येक प्रसंगात प्रचीती येते. जसे की अर्जुन आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद असतील किंवा श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील जिव्हाळा. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गुरू आपल्याला अनेक लहान, मोठे, थोर अश्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभत असते. अश्या व्यक्तींचा आदर आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात केलाच पाहिजे. आपण पोटात असल्या पासून तर आपण जन्माला आल्यावर आपल्याला चालणे शिकवते, बोलणे शिकवते, प्रत्येक व्यक्तीची ओळख, ही आपल्याला आई च प्रथम गुरू बनून देत असते. जीवनातील सर्वात मोठा अमुल्य ठेवा म्हणजे गुरू. जो जो गुरू शी एकरूप झाला त्याचा उद्घारच झाला आहे. भाग्य आणि कर्म जुडून आले की आपल्याला गुरू ची प्राप्ती होते. शिष्य असा भक्त असला पाहिजे गुरू चा की गुरू जे करणार ते माझ्यासाठी सदैव योग्य च असणार असा असीम विश्वास ठेवणारा. शिष्य आणि...