गुरुपौर्णिमा : गुरू आणि शिष्याचे नाते जसे कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण आणि द्रौपदी
आज गुरू पौर्णिमा.. गुरू पौर्णिमा म्हटलं की आपला गुरु बद्दल असलेला आदर व्यक्त करण्याचा दिवस.
खरं तर आपल्या देशाला गुरुशिष्य परंपरेची खुप मोठी आणि पवित्र संस्कृती लाभलेली आहे. महाभारत काळात तर या गुरुशिष्य परंपरेची प्रत्येक प्रसंगात प्रचीती येते. जसे की अर्जुन आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्यातील संवाद असतील किंवा श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील जिव्हाळा. आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गुरू आपल्याला अनेक लहान, मोठे, थोर अश्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभत असते. अश्या व्यक्तींचा आदर आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात केलाच पाहिजे. आपण पोटात असल्या पासून तर आपण जन्माला आल्यावर आपल्याला चालणे शिकवते, बोलणे शिकवते, प्रत्येक व्यक्तीची ओळख, ही आपल्याला आई च प्रथम गुरू बनून देत असते. जीवनातील सर्वात मोठा अमुल्य ठेवा म्हणजे गुरू. जो जो गुरू शी एकरूप झाला त्याचा उद्घारच झाला आहे. भाग्य आणि कर्म जुडून आले की आपल्याला गुरू ची प्राप्ती होते. शिष्य असा भक्त असला पाहिजे गुरू चा की गुरू जे करणार ते माझ्यासाठी सदैव योग्य च असणार असा असीम विश्वास ठेवणारा.
शिष्य आणि गुरू चं प्रेम हे कोणत्याही नात्यांच्या पलिकडे आहे.गुरू मंत्र म्हणजे एक वचन असते गुरू ला दिलेले उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही! गुरू वर ठेवलेला विश्वास हाच खरा यशाचा केंद्रबिंदू असतो. गुरू म्हणजे धगधगता निखारा आहे अद्भुत विचारांचा. ते कधीही तुमचे गुलाम नाही होणार, त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकले तर फटके मारायला पण कमी नाही करणार. कधी तुमच्यावर प्रेम करतील तर कधी कान पकडून शिक्षा करतील. ते त्यांच्या मर्जी नुसार वागण्यास स्वतंत्र असतात.त्यांच्यावर जे कार्य सोपवले असते जन्म जन्मंतरीचे ऋणनुबंधने सोपवलेले असते कोणाशी कसे तर कोणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पूर्ण करत असतात. त्या विषयी कोण काय बोलता काय अर्थ काढता याची त्यांना कधीच पर्वा नसते. पण गुरू च्या बाह्य वर्णन वरून, वर्तना वरून, त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खर ज्ञान असलेले लोकच ओळखू शकतात. त्यांना जे हवे असते तेच ते करतात व त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्यांच्याशी मुळीच खेळू नये. म्हणून आपल्या आयुष्यात गुरुस्थानी असलेल्या सगळ्यांना वंदन करुया व पिढ्यानपिढ्या हि संस्कृती जपूया.
सौ.दिपाली चौधरी झोपे
अध्यक्षा-खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, फैजपूर



Comments
Post a Comment