Posts

Showing posts from August, 2022

जामदा येथील अतिक्रमणाच्या नावाने अपंग बांधवांवर अन्याय; समाजबांधवांनी दिले विभागीय आयुक्तांकडे निवेदन

Image
  चाळीसगाव प्रतिनिधी: दिनांक २५/०८/२०२२ गुरूवारी मौजे जामदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे झालेल्या  आदिवासी कोळी जमातीच्या अपंग बांधवांना ग्रामपंचायत प्रशासन, बी. डी. ओ. यांनी कोणालाही विश्वासात न घेता एकुण २५ दुकानांपैकी फक्त आदिवासी कोळी तेही अपंग माणसांच्या दुकानांना अतिक्रमणच्या नावाखाली हटवले म्हणून नाशिक येथील विभागीय आयुक्त मा. श्री. रामकृष्ण गमे साहेब यांना कोळी महासंघ नाशिक शहर आणि जिल्हा तर्फे निवेदन देण्यात आले. मा. आयुक्त साहेबांनी सांगितले की आपण याच्यातून योग्य असा मार्ग काढू ,कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ.      याप्रसंगी निवेदन देण्यासाठी कोळी महासंघाचे नाशिक महानगर संपर्क प्रमुख युवराज सैंदाणे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राजकोर, कोळी समाज एकता मंचचे कार्याध्यक्ष किसनभाऊ सोनवणे आणि कोळी महासंघाचे जिल्हा संघटक महेंद्र सौंदाणे आणि समाज बांधव उपस्थित होते.

राज्य पत्रकार संघाचे 'पहेलवान' मान. संजयजी भोकरे.

Image
  वाढदिवस विशेष ****************** लेखन:- प्रा. महेश पानसे, पूर्व विदर्भ अध्यक्ष,राज्य पत्रकार संघ       वारसा पदाचा नव्हे तर विचार व तत्वांचा असावा यावर ठासून बोलणारे व ठाम असलेले राज्य पत्रकार संघाचे सं स्थापक,शिलेदार मा.संजयजी भोकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्य कोटी कोटी शुभेच्छा.............................!          काही व्यक्तींमत्वाबद्दल विशेष सांगायचे वा लिहायचे म्हणजे निव्वळ औपचारिकता ठरेल मात्र महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर गोवा, कर्नाटक, गुजरात ते दिल्ली पर्यंत राज्य पत्रकार संघाचा विस्तार करण्याचा दम राज्य कार्यकारिणीला मिळाला व आज सर्वात मोठा पत्रकार संघ म्हणून जी संघाची ओळख आहे त्यामागे खरी प्रेरणा कुणाची असेल तर ती मा.संजयची भोकरे यांचीच. भोकरे साहेबांमध्ये मी मामिंक,सडेतोड वक्तृत्व व् नेतृत्व बघितले आहे.  साहेबांची पत्रकार सुष्टीच्या प्रत्येक घटकांबाबत असलेली आंतरीक तळमळ संघटनेच्या दर्जेदार विस्तारातुन् सहज लक्षात येते.   संघटनेतील प्रत्येक घटकाने ही तळमळ अंगीकारावी  हिच खर्‍या अर्थाने मान.  भोकरे ...