जामदा येथील अतिक्रमणाच्या नावाने अपंग बांधवांवर अन्याय; समाजबांधवांनी दिले विभागीय आयुक्तांकडे निवेदन

 


चाळीसगाव प्रतिनिधी: दिनांक २५/०८/२०२२ गुरूवारी मौजे जामदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे झालेल्या  आदिवासी कोळी जमातीच्या अपंग बांधवांना ग्रामपंचायत प्रशासन, बी. डी. ओ. यांनी कोणालाही विश्वासात न घेता एकुण २५ दुकानांपैकी फक्त आदिवासी कोळी तेही अपंग माणसांच्या दुकानांना अतिक्रमणच्या नावाखाली हटवले म्हणून नाशिक येथील विभागीय आयुक्त मा. श्री. रामकृष्ण गमे साहेब यांना कोळी महासंघ नाशिक शहर आणि जिल्हा तर्फे निवेदन देण्यात आले. मा. आयुक्त साहेबांनी सांगितले की आपण याच्यातून योग्य असा मार्ग काढू ,कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. 

    याप्रसंगी निवेदन देण्यासाठी कोळी महासंघाचे नाशिक महानगर संपर्क प्रमुख युवराज सैंदाणे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राजकोर, कोळी समाज एकता मंचचे कार्याध्यक्ष किसनभाऊ सोनवणे आणि कोळी महासंघाचे जिल्हा संघटक महेंद्र सौंदाणे आणि समाज बांधव उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व