खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

खान्देश नारीशक्ती तर्फे राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्काराने ३६ नारींचा गौरव

पत्रकार भवन जळगाव येथे आमदार, महापौरांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळा संपन्ऩ

जळगाव प्रतिनिधी: खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, खान्देश जनसेवा फाऊंडेशन, नारीशक्ती गृप जळगाव, खान्देश न्युज नेटवर्क आणि इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नारीदिप सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या ब्रिजलालभाऊ पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्रीताई महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे जळगाव , आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव,युवती सहसंयोजिका अमृता पाटील धुळे ग.स.सोसायटी माजी अध्यक्ष विलास नेरकर, रावेर संगायो समीती अध्यक्ष तुकाराम बोरोले, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप जळगाव अध्यक्षा मनिषा किशोर पाटील,ज्योती राणे इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थीत होते.

पुरस्कारप्राप्त ३६ नारीशक्ती

      पं.स.सदस्या प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले खिरोदा यांना नारीरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर रावेर पं.स.सदस्या योगिता रामदास वानखेडे, आरोग्य सेविका पल्लवी पुरुषोत्तम भारंबे, जागतिक व्याख्याता व कतार देशात वास्तव्यास असलेल्या प्रा.डॉ.अरुणा धाडे यांना राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.स्मार्ट ग्राम चिनावल च्या सरपंच भावना योगेश बोरोले,भादली येथील शाळा केंद्रप्रमुख वैशाली रमेश बाविस्कर,नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या दिपा प्रमोद येवले यांना राज्यस्तरीय नारीरत्न प्रदान करण्यात आला.
          आदर्श शिक्षीका व उत्कृष्ट सुत्रसंचालिका ज्योती लिलाधर राणे जळगाव, न्हावी येथील तंत्रस्नेही शिक्षीका अश्विनी योगेश कोळी, ऐरोली मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा बेंडाळे, पुणे येथील कायदेतज्ञ व वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ॲड.जया बाळकृष्ण उभे,जानोरी येथील महिला पोलीस पाटील रहिसा सलीम तडवी, नांदुरा येथील सामाजिक कार्यकर्त्या रुबीना अन्वर पटेल,वडली शाळेच्या उपक्रमशील शिक्षीका मोनिका विजय चौधरी,कानळदा शाळेच्या उपक्रमशील शिक्षीका ललिता नितीन पाटील, चाळीसगाव येथील आश्रमशाळा शिक्षीका व सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा संजय राजपूत, रावेर येथील आदर्श उर्दू शिक्षीका गज़ाला तबस्सुम सैय्यद अजगर अली, जळगाव येथील आरोग्य दूत भारती रविंद्र काळे, सुर्या फाऊंडेशन अध्यक्षा अर्चना प्रशांत सूर्यवंशी, चिंचोली तालुका यावल येथील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती किशोर देवरे, गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रिडापटू व सामाजिक कार्यकर्त्या कु.रश्मी वसंत वाळके, जळगाव येथील उपक्रमशील शिक्षीका शुभांगी पराग बडगुजर, पाळधी बु.येथील उपक्रमशील शिक्षीका मनिषा शैलेश शिरसाठ, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या धारा कृष्णकांत ठाकर, जळगाव येथील उपक्रमशील शिक्षीका स्नेहल प्रकाश ठाकुर, मुक्ताईनगर येथील स्पोर्ट्स व योग शिक्षिका डॉ.प्रतिभा भास्कर ढाके, फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या साक्षी महेंद्र पाटील, रावेर येथील निसर्ग संवर्धक शिक्षीका नयना निलेश पाटील, जळगाव येथील योगा व फिटनेस ट्रेनर मनिषा किशोर पाटील, चाळीसगाव येथील मेकअप आर्टिस्ट स्वाती किसन जाधव, उपक्रमशील शिक्षीका छाया अजय पाटील,वढोदा येथील उपक्रमशील शिक्षीका शालिनी सोमकुंवर, चाळीसगाव येथील गृहउद्योजिका वैशाली नितीन पाटील, चाळीसगाव येथील मानवाधिकार कार्यकर्त्या सविता कुमावत, अंगणवाडी सेविका चाळीसगाव मंगलबाई रघुनाथ खलाल, अंगणवाडी सेविका वडाळा द्वारकाबाई किशोर शेवरे यांना राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Comments

  1. Thank you khandesh naarishakti And Mikhandeshi news

    ReplyDelete
    Replies
    1. खुप खुप धन्यवाद!!!🙏🏻
      खुप खुप आभार!!🙏🏻
      नारीशक्ति आणि मी खानदेश न्यूज नेटवर्क चे 💐💐🌹🌹🙏🏻

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व