Posts

Showing posts from October, 2020

फैजपूर येथे गांधी जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती तर्फे चर्चासत्राचे आयोजन

Image
फैजपूर येथे गांधी जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती तर्फे चर्चासत्राचे आयोजन फैजपूर प्रतिनिधी: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.अहिंसेच्या मार्गाने देखील खुप मोठी क्रांती घडू शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजेच महात्मा गांधी आहेत असे प्रतिपादन नपा गटनेते कलिम खान मण्यार यांनी व्यक्त केले.        देशाला सध्याच्या युद्धजन्य परिस्थीतीत लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज आहे असे विचार खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.        कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी फैजपूर नगरपरिषद काँग्रेस गटनेते कलिम खान मन्यार,शिवसेना गटनेते अमोल निंबाळे, खान्देश नारीशक्ती संघटना अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,भाजप सरचिटणीस संजय भावसार, भाजप माजी शहराध्यक्ष तसेच वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय रल,जनसंघ प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील, देवेंद्र झोपे सर, जगन्नाथ नारखेडे नाझीम शेख, सुरेश नारखे...

यावल तहसिलदारांना अधिकार्यांसमक्ष शिविगाळ व धक्काबुक्की

Image
यावल तहसिलदारांना अधिकार्यांसमक्ष शिविगाळ व धक्काबुक्की   यावल येथील पुंडलिक बारी विरुद्ध गुन्हा दाखल यावल प्रतिनिधी:यावल तहसिलदार कार्यालयात तहसिलदारांच्या कॅबिन मधे अनधिकृतपणे प्रवेश करुन शिविगाळ करत अंगावर धावून आल्याप्रकरणी पुंडलिक बाजिराव बारी रा.बारीवाडा यावल यांच्यावर यावल पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   तहसिलदार जितेंद्र कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल शहरातील शिव भोजनाचा ठेका आरोपी पुंडलिक बाजिराव बारी यांस दिला नाही या गोष्टीचा राग येऊन आज सकाळी ११ ते ११:२० च्या सुमारास तहसिलदार कार्यालयात येऊन तहसिलदार जितेंद्र कुंवर हे करीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कर्तव्यात अडथळा निर्माण करुन धमकाविणे, दमदाटी करणे, अरेरावीने, उद्धटपणे बोलणे, अंगावर धावून येऊन टेबलावर पैसे फेकणे असे कृत्य केले म्हणून सदर पुंडलिक बाजिराव बारी विरुद्ध यावल पोलिस स्टेशनमध्ये भाग ५ गरनं १५७/२०२०भादवि कलम ३५३,४५२,१८६,५०४,५०६ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.धनवडे यांचे मार्गदर्शनाखा...