फैजपूर येथे गांधी जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती तर्फे चर्चासत्राचे आयोजन

फैजपूर येथे गांधी जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती तर्फे चर्चासत्राचे आयोजन

फैजपूर प्रतिनिधी: महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.अहिंसेच्या मार्गाने देखील खुप मोठी क्रांती घडू शकते याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजेच महात्मा गांधी आहेत असे प्रतिपादन नपा गटनेते कलिम खान मण्यार यांनी व्यक्त केले.
       देशाला सध्याच्या युद्धजन्य परिस्थीतीत लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची गरज आहे असे विचार खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी फैजपूर नगरपरिषद काँग्रेस गटनेते कलिम खान मन्यार,शिवसेना गटनेते अमोल निंबाळे, खान्देश नारीशक्ती संघटना अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,भाजप सरचिटणीस संजय भावसार, भाजप माजी शहराध्यक्ष तसेच वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय रल,जनसंघ प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील, देवेंद्र झोपे सर, जगन्नाथ नारखेडे नाझीम शेख, सुरेश नारखेडे,पार्थ झोपे, शशिकला चौधरी,अर्चना भारंबे,नलीनी नारखेडे, रुक्मिणी नारखेडे,गुणेश्री झोपे इ.उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व