बोरखेडा पिराचे येथील शाहेदिलावर बाबांच्या यात्रेनिमित्त मानाची काठी आणण्याचा सोहळा संपन्न
बोरखेडा पिराचे येथील शाहेदिलावर बाबांच्या यात्रेनिमित्त मानाची काठी आणण्याचा सोहळा संपन्न संदिप पाटील बोरखेडा: येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान हजरत बंदगिमिया शाहेदिलावर बाबा यांच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे मानाची काठी आणण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जातेगाव ते बोरखेडा पन्नास किलोमीटर प्रवास करतात पायी जातेगाव येथील महादेव मंदिर परिसरातील जंगलात भल्या पहाटे चार वाजता बोरखेडा येथील भक्त मंडळी जातात व जंगलातील सर्वात मोठ्या बांबुची पुजा करुन स्वच्छ करण्यात आली.त्यानंतर सर्व भक्तांनी ही मानाची काठी आपल्या खांद्यावर घेऊन पायी चालत जातेगाव ते बोरखेडा जवळपास पन्नास किलोमीटर अंतर पायी प्रवास करुन बोरखेडा येथे संध्याकाळी उशीरा आणण्यात आली.रस्त्यात ठिकठिकाणी शाहेदिलावर बाबांच्या या मानाच्या काठीचे लोकांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोना चे सर्व नियम पाळून व सोशल डीस्टंसिंग राखत मोजक्या तरुणांनी हे नियोजन केले होते.मानाच्या काठीचे विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी य...