खान्देश नारीशक्ती तर्फे आदिवासी पाड्यांवर 'पाड्यावरची दिवाळी' साजरी
खान्देश नारीशक्ती तर्फे आदिवासी पाड्यांवर 'पाड्यावरची दिवाळी' साजरी
आदिवासी मुलांना केलं फराळ व मिठाईचे वाटप
फैजपूर प्रतिनिधी:शासनाच्या फटाकेमुक्त दिवाळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी दिवाळीतील फटाके खरेदी न करता फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगत मुलांना विश्वासात घेऊन फटाक्यांऐवजी त्या खर्चात दिवाळी फराळ व मिठाई तयार करुन खान्देश नारीशक्ती गृप व दिपाली गृप्स तर्फे गारबर्डी-पाल परीसरातील अत्यंत हालाखीचे जीवन जगत असलेल्या आदिवासी, कष्टकरी शेतमजुरांच्या शेकडो मुलांना फराळ व मिठाईचे वाटप करुन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
जुनी मोहमांडली,गारबर्डी,पाल परीसरातील विविध आदिवासी पाडे,वस्त्यांवर जाऊन तेथील लहान मोठ्या सर्व मुलांना एकत्र जमवून त्यांना खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,कु.गुणेश्री झोपे,चि.पार्थ झोपे यांनी स्वतः दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप केले तसेच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.यामुळे आदिवासी वस्तीवरील सर्व मुले व पालक यांना खुप आनंद झाला व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करुन मिठाई वाटप केल्याबद्दल सर्वच पालकांनी दिपाली गृप्स व सौ.दिपाली चौधरी झोपे यांचे आभार मानले.
फटाके व इतर अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा गोरगरीब आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील लहान मुलांसोबत मिठाई देऊन दिवाळी साजरी करणं हा खुप चांगला सामाजिक उपक्रम असुन पुढील वर्षापासून तो लोकसहभागातून व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. यावेळी कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना तालुका अध्यक्ष अक्षय धांडे, देवेंद्र झोपे सर जन संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील उपस्थित होते.
Comments
Post a Comment