बोरखेडा पिराचे येथील शाहेदिलावर बाबांच्या यात्रेनिमित्त मानाची काठी आणण्याचा सोहळा संपन्न

बोरखेडा पिराचे येथील शाहेदिलावर बाबांच्या यात्रेनिमित्त मानाची काठी आणण्याचा सोहळा संपन्न

संदिप पाटील बोरखेडा:येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेले जागृत देवस्थान हजरत बंदगिमिया शाहेदिलावर बाबा यांच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे मानाची काठी आणण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जातेगाव ते बोरखेडा पन्नास किलोमीटर प्रवास करतात पायी
   जातेगाव येथील महादेव मंदिर परिसरातील जंगलात भल्या पहाटे चार वाजता बोरखेडा येथील भक्त मंडळी जातात व जंगलातील सर्वात मोठ्या बांबुची पुजा करुन स्वच्छ करण्यात आली.त्यानंतर सर्व भक्तांनी ही मानाची काठी आपल्या खांद्यावर घेऊन पायी चालत जातेगाव ते बोरखेडा जवळपास पन्नास किलोमीटर अंतर पायी प्रवास करुन बोरखेडा येथे संध्याकाळी उशीरा आणण्यात आली.रस्त्यात ठिकठिकाणी शाहेदिलावर बाबांच्या या मानाच्या काठीचे लोकांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले.
  यावेळी कोरोना चे सर्व नियम पाळून व सोशल डीस्टंसिंग राखत मोजक्या तरुणांनी हे नियोजन केले होते.मानाच्या काठीचे विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी दर्शन घेऊन पाच पाऊले काठी खांद्यावर घेत अभिवादन केले.हजरत बंदगिमिया शाहेदिलावर बाबा यांचे बोरखेडा येथे जागृत देवस्थान असुन त्यांच्या नावाने या गावाला बोरखेडा पिराचे म्हणून ओळखले जाते.बोरखेडा पिराचे हे गाव चाळीसगाव पासुन बारा किलोमीटर अंतरावर असुन हिंदू मुस्लिम समाजासह सर्व जाती धर्माचे लोक शाहेदिलावर बाबांच्या आशिर्वादाने गुण्यागोविंदाने नांदत आहेत.शाहेदिलावर बाबांवर बोरखेडा गावासह पंचक्रोशीतील सर्व गावकर्यांची नितांत श्रद्धा असुन वर्षभर देशभरातील हजारो लोक या गावाला शाहेदिलावर बाबांच्या दर्शनासाठी भेट देत असतात.
यावर्षी यात्रोत्सवावर कोरोनाचे सावट?
    दरवर्षी जानेवारी महिन्यात याठिकाणी यात्रोत्सव साजरा करण्यात येतो पण यावर्षी सालाबादप्रमाणे यात्रा भरते भरविण्यात येईल की नाही याबाबत येत्या काही दिवसांत प्रशासनासोबत चर्चा करुन व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ठरवले जाईल असे शंकर शेठ जैन, खंडुभाऊ पाटील, भैय्या पाटील व सर्व प्रमुख स्वयंसेवकांनी सांगितले.शाहेदिलावर बाबांच्या कृपेने जगावरील कोरोना महामारीचे संकट लवकरच दुर होऊन निष्पाप लोकांचे प्राण वाचावेत तसेच यावर्षीही सालाबादप्रमाणे शाहेदिलावर बाबांचा यात्रोत्सव बोरखेडा येथील पुण्यभूमीत पार पडावा अशीच बाबांच्या चरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व