आ.मंगेश चव्हाणांचा दणका: शेतकऱ्यांना येत्या १५ दिवसांत मिळणार रावळगाव कारखान्याकडील थकीत पेमेंट
आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली रावळगाव एस.जे.शुगर संचालिका मीरा घाडीगावकर यांची भेट, उर्वरित देयके येत्या १५ दिवसात देण्याची कंपनीने दिली लेखी हमी... खान्देश न्युज नेटवर्क– शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तीव्र भूमिका घेतल्यानंतर नरमलेल्या रावळगाव येथील एस.जे.शुगर कंपनीने गेल्या आठवड्यात प्रति टन उसामागे १००० रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली. मात्र उर्वरित देयकांबाबत कारखान्याने अजून भूमिका स्पष्ट केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी एस.जे.शुगरच्या संचालिका मीरा घाडीगावकर यांची दि.२९ जून रोजी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी कंपनी संचालिका घाडीगावकर यांच्याशी चर्चा करताना सांगितले की, बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन १ हजार रुपये याप्रमाणे देयके जमा झाली आहेत तर उर्वरित शेतकऱ्यांना चेक स्वरुपात देयके दिली जात आहेत. सदर चेक देताना पैश्यांच्या मागणीचे ग...