वडाळा येथे तलाव निर्माणाचा शुभारंभ

एपिरॉक मायनिंग,नाम फाऊंडेशन,भुजल अभियान व शेतकरी सहभागातून वडाळा येथे तलाव निर्माणाचा शुभारंभ



वडाळा प्रतिनिधी : एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व शेतकरी सहभागातून आणि भूजल अभियानाच्या सौजन्याने, एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत वडाळा येथे "१ गाव १ तलाव" उपक्रम व तलाव निर्माण कार्याचा शुभारंभ करण्यात आला.

         चाळीसगाव तालुक्यात एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व शेतकरी सहभागातून एपिरॉक अमृतधारा कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यात ७ तलाव होणार आहेत. एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड कंपनी चे धनाजी पुरी सर, नाम चे गणेश जी थोरात यांनी भूजल अभियानाच्या भूजल वारकरी टीम सोबत ७ गावांमध्ये तलाव पाहणी साठी शिवार फेरी केली. शिवार फेरी झाल्या नंतर वडाळा या गावात तलावाच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक १४ जून रोजी  गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.गावात या कामाचा मोठ्या प्रमाणात उत्साह असून शेतकरी या कामासाठी लोक सहभाग जमा करत आहेत.तलावातील सुपीक गाळ शेतकरी स्वखर्चाने बांधावर टाकून घेत आहे ज्यामुळे जमिनीची पोत देखील सुधारणार आहे व तलाव गाळमुक्त झाल्यामुळे पाण्याचा साठा देखील वाढणार आहे.

           या कामामुळे साधारण १५०-२०० हेक्टर क्षेत्राला फायदा होईल असा अंदाज आहे.गावातील भूजल दिंडी प्रमुख, भूजल पाणी समिती व भूजल वारकरी टीम या कामासाठी मेहनत घेत आहेत.या वेळी  हिरकणी महिला मंडळच्या अध्यक्षा सुचित्रा ताई पाटील,नाम फाउंडेशन चे अभिलाष जी, व गावातून अशोक आमले सरपंच, निलेश अहिरराव पोलीस पाटील, अशोक जौरी आमले माजी सरपंच,संजय आमले, अनील अहिरराव, प्रशांत शेवरे, बापूजी पाटील, बापू आमले, सुरेश आमले, एकनाथ पाटील, भूषण पाटील, दिपक पाटील, किशोर शेवरे व भुजल टीम मधून प्रवीण राठोड, योगेश राठोड, निखील राठोड व पंकज राठोड उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व