Posts

Showing posts from September, 2022

खुशखबर: 'या' दिवशी जन्मलेल्या बाळांना मिळणार गोल्ड कॉईन..

Image
  पंतप्रधानांच्या वाढदिवशी जन्मलेल्या २३ बालकांना चाळीसगाव भाजपा देणार ०१ ग्रॅम सोनं चाळीसगाव प्रतिनिधी: दि.17 सप्टेंबर रोजी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात जन्माला आलेल्या बाळांना चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिळणार एक ग्रॅम सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. 23 बाळांना मिळणार प्रत्येकी 1 ग्रॅम सोन्याचे नाणे चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 17 सप्टेंबर रोजी देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुक्यात जन्माला येणाऱ्या बाळांची माहिती संकलित करण्यात आली. त्यांचे जन्म अहवाल प्राप्त करण्यात आले. १७ रोजी चाळीसगावात एकुण 23 बाळ जन्माला आल्याची नोंद झाली आहे.        दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी "सेवा पंधरवाडा" म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर साजरा होत आहे. यामध्ये विविध सेवा कार्य पक्षाच्या वतीने होणार आहेत. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे असे अनेक सेवा कार्य आहेत.     ...

चाळीसगावात 'श्रीं' च्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना

Image
  देवा समोर कुणीही वेगळं नाही म्हणत आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रेरणेने आदर्श उपक्रम चाळीसगाव प्रतिनिधी: गणेशोत्सवानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदंत गणेशोत्सव मंडळाने देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसगाव शहरातील तृत्तीय पंथीय महिलांकडून यावेळी गणेशाची आरती करण्यात आली. 'श्रीं'च्या आरतीचा मान तृत्तीयपंथी महिलांना मिळाल्याने या महिलांनी देखील आनंद व्यक्त केला.       यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राजेंद्र गवळी, आनंद खरात, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, संदीप गवळी, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते. तरी देवाजवळ कुणीच वेगळा नसतो- आ.मंगेशदादा चव्हाण यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान आदरणीय मा. नरेंद...

अन्..किर्तनादरम्यान मनोगत व्यक्त करताना आ.मंगेशदादा चव्हाणांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...

Image
  मागितल्यावर मिळते ते आश्वासन, न मागता मिळतो तो आशिर्वाद– रामायणाचार्य ढोक महाराज हजारो भाविकांच्या उपस्थितीत चाळीसगावचा एकदंत – सांस्कृतिक महोत्सवात हरिकीर्तन संपन्न आळंदी येथे कार्यक्रमात २० हजार लिटर आंबेरस व ५ ट्रक मांडे पाठविणाऱ्या खान्देशवासीयांच्या दातृत्वाचे ढोक महाराजांनी केले जाहीर कौतुक. मी जो काही आहे तो चाळीसगाव वासीयांमुळे, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी काम करत राहणार – आमदार मंगेश चव्हाण यांच्या भावनिक मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू चाळीसगाव प्रतिनिधी - सुप्रसिद्ध कीर्तनकार, रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांचे हरीकीर्तन "चाळीसगावचा एकदंत - सांस्कृतिक महोत्सवाच्या" दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ढोक महाराजांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून रामायणातील विविध दाखल्यांचा आधार घेत सद्यस्थिती वर भाष्य केले असता उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. खान्देशी लोक खूप मायाळू व दानशूर असून ज्या आळंदी मध्ये ज्ञानोबा माऊली व त्यांच्या भावंडाना शिधा मिळत नव्हता, ज्ञानदेवांची मांडे खायची इच्छा झाली तेव्हा खापर मिळाला नाही त्या आळंदी येथे खा...