चाळीसगावात 'श्रीं' च्या आरतीचा मान तृतीयपंथीयांना

 


देवा समोर कुणीही वेगळं नाही म्हणत आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रेरणेने आदर्श उपक्रम



चाळीसगाव प्रतिनिधी: गणेशोत्सवानिमित्ताने राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदंत गणेशोत्सव मंडळाने देखील एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते. चाळीसगाव शहरातील तृत्तीय पंथीय महिलांकडून यावेळी गणेशाची आरती करण्यात आली. 'श्रीं'च्या आरतीचा मान तृत्तीयपंथी महिलांना मिळाल्याने या महिलांनी देखील आनंद व्यक्त केला.

      यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, एकदंत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, किशोर रणधीर, माजी नगरसेवक भास्कर पाटील, राजेंद्र गवळी, आनंद खरात, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, संदीप गवळी, राहुल पाटील, कपिल पाटील आदी उपस्थित होते.

तरी देवाजवळ कुणीच वेगळा नसतो- आ.मंगेशदादा चव्हाण


यावेळी प्रतिक्रिया देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान आदरणीय मा. नरेंद्र मोदी यांनी देशात तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणार्थ राष्ट्रीय पोर्टल तयार केले असून त्या माध्यमातून संपूर्ण देशात तृतीयपंथांचे कल्याण व संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या विचाराच्या प्रेरणेतून चाळीसगावच्या एकदंताची महाआरतीचा मान शहरातील तृतीयपंथीयांना देण्यात आला होता. निसर्गाने जरी त्यांना वेगळेपण दिल असलं तरी देवाजवळ कुणीच वेगळा नसतो हा संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न होता अस ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात तृतीयपंथींयांच्या प्रश्न मार्गे लावण्यासाठी प्रयत्न असल्याचेही सांगितले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व