खुशखबर: 'या' दिवशी जन्मलेल्या बाळांना मिळणार गोल्ड कॉईन..
पंतप्रधानांच्या वाढदिवशी जन्मलेल्या २३ बालकांना चाळीसगाव भाजपा देणार ०१ ग्रॅम सोनं
चाळीसगाव प्रतिनिधी: दि.17 सप्टेंबर रोजी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात जन्माला आलेल्या बाळांना चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिळणार एक ग्रॅम सोन्याचे नाणे दिले जाणार आहे.
23 बाळांना मिळणार प्रत्येकी 1 ग्रॅम सोन्याचे नाणे
चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 17 सप्टेंबर रोजी देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुक्यात जन्माला येणाऱ्या बाळांची माहिती संकलित करण्यात आली. त्यांचे जन्म अहवाल प्राप्त करण्यात आले. १७ रोजी चाळीसगावात एकुण 23 बाळ जन्माला आल्याची नोंद झाली आहे.
दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा कालावधी "सेवा पंधरवाडा" म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर साजरा होत आहे. यामध्ये विविध सेवा कार्य पक्षाच्या वतीने होणार आहेत. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे असे अनेक सेवा कार्य आहेत.
सेवा पंधरवड्याचाच भाग म्हणून चाळीसगाव भारतीय जनता पार्टीने अनोखा उपक्रम हाती घेत आदरणीय मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी चाळीसगावात जन्माला आलेल्या बाळांना प्रत्येकी एक ग्रॅम सोन्याचे नाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बाळांच्या आईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक दिमाखदार सोहळा साजरा करण्यात येणार आहे आणि सोन्याची नाणी दिली जाणार आहेत.
आ.मंगेश चव्हाणांनी केलं उपक्रमाचे कौतुक
दिनांक 18 सप्टेंबर रोजी आमदार श्री. मंगेश दादा चव्हाण यांनी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन बाळांना भेटी दिल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.


Comments
Post a Comment