जळगाव जिल्हा बँकेत सत्तांतर;दुध संघानंतर बॅंकेत आ.खडसेंना धक्का देत आ.मंगेश चव्हाण ठरले किंगमेकर!

संपुर्ण व्हिडिओ बघा👇👇👇

 जळगाव जिल्हा बँकेत सत्तांतर;दुध संघानंतर बॅंकेत आ.खडसेंना धक्का देत आ.मंगेश चव्हाण ठरले किंगमेकर!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत आज अत्यंत नाटकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी चे संजय पवार हे सेना भाजप व सर्वपक्षीय संचालकांच्या पाठिंब्यावर विजयी झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथील भाजपा आमदार व जळगाव जिल्हा दुध संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाल्यामुळे राष्ट्रवादीला जबरदस्त बसला आहे.



आज सकाळी जिल्हा बँक चेअरमन पदासाठी राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी रवींद्र भैया पाटीलच विजय होणार असे माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु थोड्याच वेळानंतर राजकीय गणित बदलायला लागली आणि संजय पवार हे विजयी झाले. रवींद्र भैय्या यांना दहा तर संजय पवार यांना 11 मतं मिळाली. या निवडणुकीची सूत्र आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने खेळी खेळत संजय पवार यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. दरम्यान संजय पवार यांच्या विजयामुळे राष्ट्रवादीलाच नव्हे तर पर्यायी खडसे गटाला पुन्हा एकदा जबरदस्त देण्यात आमदार मंगेश यशस्वी झाले आहेत.







 #jdcc #jalgaon #dailynews #jalgaonmarathinews #khandeshnews #live #mangeshchavan #mlamangeshchavan #jalgaonzilhabank #eknathkhadase #sanjaypawar #amolchimanraopatil 

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व