आ.मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज


 खते व बियाण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा


बोगस खते व बियाणे उत्पादकांवर कारवाई करावी.. रासायनिक खतांचा लिंकिंग पद्धतीने पुरवठा बंद करण्याची केली मागणी


मुंबई प्रतिनिधी (संदीप पाटील) :  राज्यभरात गाजत असलेल्या बोगस खते आणि बियाण्यांच्या विषयावर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या बोगस खते व बियाणे उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे. तसेच चाळीसगाव मतदारसंघात कुणी असे प्रकार करत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईत हयगय केली जाणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

     यासोबतच कृषी केंद्र चालकांची राज्यस्तरीय संघटना असणाऱ्या महाराष्ट्र फर्टीलाईजर्स, पेस्टीसाईडस सीड्स डीलर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदार मंगेश चव्हाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद तराळपाटील, महासचिव विपिन कासलीवाल आदी उपस्थित होते. 

      मागील खरीप व रब्बी हंगाम २०२२ मध्ये, रासा. खते पुरवठादार कंपन्याकडून, युरीया व संयुक्त खतासोबत इतर खते लिकींग पध्दतीने विक्रेत्याची मागणी नसतानाहि मोठया प्रमाणांत पाठवून विक्रेत्यांना लिकींग पध्दतीची खते विक्री करणेची सक्ती केलेली आहे. सदर लिकींगचा माल शेतक-यांनी खरेदी करणेस नकार दिल्याने शेतकरी व विक्रेते यांच्यामध्ये वादविवाद झाल्याने विक्रेते युरीया व संयुक्त खतासोबत इतर खतांची लिकींग पध्दतीने विक्री करतात असे चित्र दैनिक वृत्तपत्रे व मिडीया यांचेकडून निर्माण केले गेले. याबाबत कृषी आयुक्तालयामध्ये रासा. खतांचे पुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी व माफदा विक्रेते संघटनेचे पदाधिकारी यांची सभा होऊनहि कंपन्याकडून लिकींग पध्दतीने इतर खते पुरवठा करण्याचे थांबलेले नाही. सोबतच विक्रेत्यांच्या पुढील अडीअडचणीबाबत तातडीने उचित कार्यवाही व्हावी अशी विनंती सदर निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली गेली. त्यात रासायनिक खते विक्रेत्यास एफ ओ‌ आर (विक्री केंद्रामध्ये पोहोच पध्दतीने) मिळावी, बियाणे गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलसाठी रक्कम विक्रेत्यास मिळावी, मुदतबाहय किटकनाशक औषधे संबंधीत पुरवठादार कंपनीने परत जमा करुन घ्यावे, ऑनलाईन पध्दतीने बियाणे, रासा.खते किटकनाशके व इतर साहित्य विक्रीस बंदी घालावी, विक्रेत्याकडून घेतलेला सॅम्पल फेल ठरल्यास, विक्रेत्यास आरोपी न समजता साक्षीदार ठरविणेबाबतच्या मागण्या केल्या गेल्या.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व