Posts

Showing posts from October, 2021

दिवाळीच्या दिवशी महावितरण विरोधात शिंगाडे मोर्चा-आमदार मंगेश चव्हाण

Image
हे तर ऐन दिवाळीत मनमानी पद्धतीने सक्तीची विजबिल वसुली करणारे "महावसुली" सरकार-आ.चव्हाण चाळीसगाव प्रतिनिधी: कोरोना महामारी मुळे राज्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार, कष्टकरी वर्ग अगोदरच अक्षरशः मोडून पडला आहे.त्यात कमी होती की काय म्हणून लगेचच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर व कधीही भरुन न येणारे नुकसान झाले असून या आघाडी सरकारने अशा भीषण परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी कामगार, व्यापारी बांधवांना एक रुपयाची मदत तर केलीच नाही परंतु इंग्रजांनाही लाजवेल अशा अतिशय जुलमी पद्धतीने सक्तीची विजबिल वसुली सुरू केली असून ऐन दिवाळीत जनतेच्या जिवनात अंधार पसरवण्याचे काम हे सरकार आणि महावितरण करत आहे. हे महाविकास आघाडी नसून महावसुली सरकार आहे अशी खरमरीत टिका चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली आहे.        दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि हे महावसुली सरकार मात्र ऐन दिवाळीत सक्तीची विजबिल वसुली करत असुन अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी बांधवांचा विज पुरवठा कापण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून...

सातासमुद्रापार भरारी घेतलेले समुद्रासारखे व्यक्तीमत्व:प्रा.अरुणाताई धाडे

Image
सातासमुद्रापार भरारी घेतलेले समुद्रासारखे व्यक्तीमत्व : प्रा.अरुणाताई धाडे  परवा जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय नारीदीप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा अतिशय शानदार संपन्न झाला.यावेळी राज्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील जवळपास ३६ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सगळ्यात श्रीमंत देश असलेल्या कतार देशातुन प्रा.अरुणा धाडे यांची उपस्थिती.अवघ्या २ मिनीटाच्या मनोगतातून अरुणाताईंनी संपूर्ण सभागृहाचे मनं जिंकली होती.       आमच्या मोठ्या ताई व मार्गदर्शिका, जगातील सर्वात श्रीमंत देशात उच्चपदावर असुन देखील मातृभुमी व आपल्या लोकांविषयी असलेले प्रेम नेहमीच आपल्या कृतीतून व कर्तुत्वातुन दाखवून देणारे स्वच्छ व्यक्तीमत्व अरुणाताई धाडे यांच्या निखळ मैत्रीचा अनुभव व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची मी आणि आमचे बंधु संदिप भाऊ पाटील आम्ही स्नेहपुर्ण भेट घेतली असता खुप आनंद झाला.        अरुणाताईंच माहेर भुसावळ येथील आहे पण गेली 16-17 वर्षांपासून त्या नोकरी...

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Image
खान्देश नारीशक्ती तर्फे राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्काराने ३६ नारींचा गौरव पत्रकार भवन जळगाव येथे आमदार, महापौरांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार सोहळा संपन्ऩ जळगाव प्रतिनिधी: खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन, खान्देश जनसेवा फाऊंडेशन, नारीशक्ती गृप जळगाव, खान्देश न्युज नेटवर्क आणि इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नारीदिप सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.       जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या ब्रिजलालभाऊ पाटील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्रीताई महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे जळगाव , आमदार मंगेशदादा चव्हाण चाळीसगाव, धुळे येथील माजी महापौर जयश्री अहिरराव,युवती सहसंयोजिका अमृता पाटील धुळे ग.स.सोसायटी माजी अध्यक्ष विलास नेरकर, रावेर संगायो समीती अध्यक्ष तुकाराम बोरोले, खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप जळगाव अध्यक्षा मनिषा किशोर पाटील,ज्योती राण...