सातासमुद्रापार भरारी घेतलेले समुद्रासारखे व्यक्तीमत्व:प्रा.अरुणाताई धाडे
परवा जळगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय नारीदीप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा अतिशय शानदार संपन्न झाला.यावेळी राज्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील जवळपास ३६ विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जगातील सगळ्यात श्रीमंत देश असलेल्या कतार देशातुन प्रा.अरुणा धाडे यांची उपस्थिती.अवघ्या २ मिनीटाच्या मनोगतातून अरुणाताईंनी संपूर्ण सभागृहाचे मनं जिंकली होती.
आमच्या मोठ्या ताई व मार्गदर्शिका, जगातील सर्वात श्रीमंत देशात उच्चपदावर असुन देखील मातृभुमी व आपल्या लोकांविषयी असलेले प्रेम नेहमीच आपल्या कृतीतून व कर्तुत्वातुन दाखवून देणारे स्वच्छ व्यक्तीमत्व अरुणाताई धाडे यांच्या निखळ मैत्रीचा अनुभव व त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची मी आणि आमचे बंधु संदिप भाऊ पाटील आम्ही स्नेहपुर्ण भेट घेतली असता खुप आनंद झाला.
अरुणाताईंच माहेर भुसावळ येथील आहे पण गेली 16-17 वर्षांपासून त्या नोकरीनिमित्त कतार या देशात वास्तव्यास आहेत. तेथील विद्यापीठात अरुणाताईंचे व्याख्यान आयोजित केले जातात, तसेच ताईंचे शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. कोरोना संकटकाळात देखील अरुणाताईंनी विदेशात असुन देखील आपल्या भुसावळ भागातील गरजुंना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
अरुणाताईंनी आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन व नारीशक्ती गृप, खान्देश जनसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने नारिदिप सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ताईंना राज्यस्तरीय नारीगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. परवा संध्याकाळी त्यांनी आग्रहाने त्यांच्या भुसावळ येथील निवासस्थानी बोलावले आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह आमचे बंधु संदिप भाऊ पाटील अध्यक्ष खान्देश जनसेवा फाऊंडेशन हेदेखील उपस्थित होते.ताईंनी भरलेल्या डोळ्यांनी आमचा निरोप घेतला आणि लगेच कतार जाण्यासाठी निघाल्या.. कदाचित आतापर्यंत त्या तिकडे पोहोचल्या देखील असतील.परंतु त्या प्रेमळ भेटितुन अजुनही त्या माझ्यासोबतच आहेत अशी जाणीव होत आहे.
Comments
Post a Comment