दिवाळीच्या दिवशी महावितरण विरोधात शिंगाडे मोर्चा-आमदार मंगेश चव्हाण
हे तर ऐन दिवाळीत मनमानी पद्धतीने सक्तीची विजबिल वसुली करणारे "महावसुली" सरकार-आ.चव्हाण
चाळीसगाव प्रतिनिधी: कोरोना महामारी मुळे राज्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार, कष्टकरी वर्ग अगोदरच अक्षरशः मोडून पडला आहे.त्यात कमी होती की काय म्हणून लगेचच अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर व कधीही भरुन न येणारे नुकसान झाले असून या आघाडी सरकारने अशा भीषण परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी कामगार, व्यापारी बांधवांना एक रुपयाची मदत तर केलीच नाही परंतु इंग्रजांनाही लाजवेल अशा अतिशय जुलमी पद्धतीने सक्तीची विजबिल वसुली सुरू केली असून ऐन दिवाळीत जनतेच्या जिवनात अंधार पसरवण्याचे काम हे सरकार आणि महावितरण करत आहे. हे महाविकास आघाडी नसून महावसुली सरकार आहे अशी खरमरीत टिका चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि हे महावसुली सरकार मात्र ऐन दिवाळीत सक्तीची विजबिल वसुली करत असुन अनेक शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी बांधवांचा विज पुरवठा कापण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून मनमानी पद्धतीने वीजबिलांची वसुली करणाऱ्या महावसुली आघाडी सरकारचा जाहीर निषेध व वीज वितरण कंपनी च्या निषेधार्थ दि.५ नोव्हेंबर रोजी काळी दिवाळी साजरी करून संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार असून लवकरच आंदोलनाची पुढील सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment