निराधार योजना लाभार्थ्यांना आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात मोफत दाखले उपलब्ध होणार
चाळीसगाव प्रतिनिधी: शासनाच्या नवीन निर्देशानुसार चाळीसगाव तालुक्यातील १४ हजाराहून अधिक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना २१ हजारांचे उत्पन्न दाखले तहसील कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वृद्ध, विधवा, अपंग आदी निराधारांची मोठी गैरसोय होत असून कागदपत्रे घेऊन ऊन असो पाऊस असो सदर लाभार्थ्यांना २१ हजाराचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे.
लाभार्थ्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन काही दलालांनी त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू केल्याच्या तक्रारी आ.मंगेशदादा यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आमदारांनी तातडीने तहसील कार्यालयात व परिसरात सेतू केंद्र येथे भेट दिली व तेथील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काही वृद्ध महिला लाभार्थ्यांनी सांगितले की आम्ही आपले काम लवकर होईल या आशेने सकाळी उपाशीपोटी चाळीसगाव येथे आलो मात्र आता ४ वाजले तरी आमचे काम झाले नाही. काही दलालांनी तुमचे काम करून देतो म्हणून आमच्याकडे ५०० रुपये मागितले मात्र आम्ही महिन्याला १००० रुपये कधी मिळतील म्हणून अनेक महिने वाट पाहणार लोक, यांना कुठून ५०० रुपये द्यायचे. फॉर्म विकत घेणे, भरून घेणे, सेतू वाल्यांची फी, प्रवास भाडे यालाच ५०० रुपये खर्च होतात. दादा आता तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी करा अशी विनंती त्यांनी केली.यावेळी आ.चव्हाण यांनी सेतू सुविधा केंद्र चालकांना सूचना दिल्या की लाभार्थ्यांकडून शासकीय फी वगळता कुणीही जादा पैसे घेऊ नये, तसेच येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना सौजन्याने वागणूक देण्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले.
तद्नंतर आ.मंगेशदादांनी तहसीलदार अमोल मोरे यांची लाभार्थ्यांसोबत भेट घेतली व त्यांना लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व तक्रारी बाबत अवगत केले. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरात उत्पन्न दाखले मागविले जात असून चाळीसगाव तालुक्यात निराधार योजनेचे एकूण १४००० लाभार्थी आहेत. आतापर्यंत ८००० लाभार्थ्यांनी उत्पन्न दाखले सादर केले असून ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेचा दाखला आहे त्यांना उत्पन्न दाखला काढण्याची गरज नसल्याची माहिती दिली.
उद्यापासून आमदार कार्यालयात मोफत दाखले मिळतील-आ.मंगेशदादा चव्हाण
मी त्यांना सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वृद्ध, विधवा व अपंगांना रांगेत उभे राहण्यास अडचणी येतात. तरी तहसील प्रशासनाने सहकार्य केल्यास उर्वरित लाभार्थ्यांना उत्पन्न दाखले व मानधन पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यासाठी माझ्या आमदार कार्यालयात एक सुविधा केंद्र सुरू करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून शासकीय शुल्क वगळता मोफत उत्पन्न दाखला अर्ज, झेरॉक्स व अर्ज भरण्याची सुविधा दिली जाणार असल्याची माहिती दिली. गुरुवार दि.७ जुलै पासून आमदार कार्यालय, करगाव रोड, चाळीसगाव येथे हे केंद्र सुरू होणार असल्याने लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. कुठल्याही दलाला एक रुपयाही देऊ नये असे आवाहन देखील यानिमित्ताने करतो असं यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले.

This comment has been removed by the author.
ReplyDelete🙏🙏🙏🙏
ReplyDelete