मुंदखेडे येथे लोकवर्गणीतून हनुमान मंदीराचा जीर्णोद्धार आणि शनी मंदिराचे निर्माण
मुंदखेडे येथे लोकवर्गणीतून हनुमान मंदीराचा जीर्णोद्धार व नवीन शनी मंदिर निर्माण
मुंदखेडे बुद्रुक या गावात नवीनच हनुमान मंदिरचा जीर्णोद्धार व नवीन शनी मंदिर बांधले, ओम हवन पूजा विधि 26 जानेवारी ते 27 जानेवारी रोजी आयोजित केली होती तसेच कीर्तनाचा कार्यक्रम 27 जानेवारी रोजी संध्याकाळी विश्वनाथ महाराजांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला व 28 जानेवारी 2023 रोजी सकाळी मान्यवरचा सत्कार व माहेर वाशीनी यांचा सत्कार करण्यात आला 27 जानेवारी रोजी सकाळी ह भ प अभयानंद गिरीजी महाराज कैलास आश्रम वेरूळ यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व होम पूजन आचार्य महेश नारायण जोशी यांनी केली
मागील तीन दिवसापासून होम हवन पूजा चालू होती व आज तालुक्यातील आजी-माजी आमदार खासदार व गावातील माहेर वासिनी उपस्थित होत्या मंदिराचे कळसाचे वर्गणी ही माहेरवाशींनी याच्या कडून होती तरी गावातील लोकांनी गावातील जावई व मुली यांचा श्री श्रीफळ हार व वटी भरून पूजन केले, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाला गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी अनमोल असे सहकार्य केले तसेच तरुण भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ यांनी खूप सहकार्य केले त्याबद्दल गावातील सर्व नागरिकांनी भजनी मंडळाचे आभार मानले.
मी खान्देशी न्यूज लाईव्ह
मुख्य संपादक संदीप पाटील
📞 9975405488
Email - mikhandeshinews@gmail.com
Comments
Post a Comment