मोठी बातमी- ॲड.शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार? ठाकरे गटाच्या दावा, तांबेंना मोठा धक्का: नाशिक पदविधर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
मुंबई- राज्यभरात चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा ठरलेला उमेदवार विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी ऐनवेळी भुमिका बदलल्याने मोठी राजकीय गुंतागुंत झालेली असतांनाच आता अपक्ष उमेदवार व भाजपच्या कार्यकर्त्या आणि महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन अध्यक्षा ॲड.शुभांगी पाटील सुर्यवंशी यांना भाजपाने टिकिट न दिल्याने त्या आज सकाळपासून मातोश्रीवर दाखल झाल्या आहेत. जवळपास तीन तास उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते.यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन भुमिका स्पष्ट केली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून ॲड.शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. तसेच ॲड.शुभांगी पाटील याच आता महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार असतील असं देखील सांगण्यात येत आहे.
Comments
Post a Comment