ना.गिरिषभाऊ महाजनांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे बाईक रॅलीसह विविध कार्यक्रम संपन्न

 https://youtu.be/OVUAzqNoLqo



ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत चाळीसगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे विकास तीर्थ बाईक रॅली संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी : केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी ९ वर्षेपूर्ती निमित्ताने "मोदी@9"
या उपक्रम अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास तीर्थ मोटार सायकल (बाईक) रॅली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा युवा वॉरियर्स शाखा उदघाट्न सोहळा पार पडला.
       ना.गिरिषभाऊ महाजन यांनी वेळात वेळ काढून सदर बाईक रॅली मध्ये सहभागी झाले व स्वतः बाईक चालवत सर्वांचा उत्साह वाढवला. तसेच ना.गिरिषभाऊ यांनी सर्वांना मार्गदर्शन करत ९ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून देशात झालेले परिवर्तन व विविध लोकोपयोगी योजनांची  माहिती दिली.
       यावेळी #आमदार_मंगेशदादा_चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बाईक रॅलीची सुरुवात भाजपा अंत्योदय जनसेवा कार्यालयापासून करण्यात आली तर अंध शाळा - कॅप्टन कॉर्नर कडून - रेल्वे स्टेशन - स्टेशन रोड - पोलीस स्टेशन - बाजार पेठ मार्गे हॉटेल शिवनेरी घाट रोड येथे समारोप करण्यात आला.
        भाजपा युवा मोर्चा चाळीसगाव शहर मंडळ उद्घाटन करण्यात आलेल्या शाखा पुढीलप्रमाणे - शाखा क्र 1 - पाटणादेवी रोड • शाखा क्र 2 - हुडको विभाग (प्रभाग क्र 15) • शाखा क्र 3 - शिवनेरी हॉटेल, घाट रोड

#girishmahajan #mangeshchavan #chalisgaon #bjp


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व