आ.मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पावसाळी अधिवेशनात उठवला आवाज
खते व बियाण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा पावसाळी अधिवेशनात पाठपुरावा बोगस खते व बियाणे उत्पादकांवर कारवाई करावी.. रासायनिक खतांचा लिंकिंग पद्धतीने पुरवठा बंद करण्याची केली मागणी मुंबई प्रतिनिधी (संदीप पाटील) : राज्यभरात गाजत असलेल्या बोगस खते आणि बियाण्यांच्या विषयावर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या बोगस खते व बियाणे उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्याकडे केली आहे. तसेच चाळीसगाव मतदारसंघात कुणी असे प्रकार करत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईत हयगय केली जाणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र चालकांची राज्यस्तरीय संघटना असणाऱ्या महाराष्ट्र फर्टीलाईजर्स, पेस्टीसाईडस सीड्स डीलर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांसोबत आमदार मंगेश चव्हाण मुख्यम...