पत्रकार संस्था फैजपूर तर्फे शासन परिपत्रकानुसार २० फेब्रुवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

पत्रकार संस्था फैजपूर तर्फे शासन परिपत्रकानुसार २० फेब्रुवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

फैजपूर प्रतिनिधी: मराठी पत्रकारितेचे पितामह,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतिविषयी अनेक तर्कवितर्कांना पुर्णविराम देत महाराष्ट्र शासनाने जयंती २० फेब्रुवारी रोजी साजरी केली जावी असे परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार शनिवार २० रोजी राज्यात सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.
      पत्रकार संस्था फैजपूर व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव यांच्या वतीने फैजपूर येथील पत्रकार संस्था कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती शासकीय तारखेनुसार शनिवारी २० फेब्रुवारी रोजी प्रतिमापूजन करुन साजरी करण्यात आली.यावेळी फैजपूर नगरपरिषदे चे गटनेते व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कलीम खान मण्यार यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष व समाजसेवक इरफान शेख इक्बाल, लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत सर,मा.नगरसेवक रियाज शेख,ज्येष्ठ पत्रकार ललित फिरके सर, पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख, उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील,सामाजिक कार्यकर्ते अशोक भालेराव यांच्यासह पत्रकार मयुर मेढे, सलीम पिंजारी,मुदस्सर नजर,शब्बीर खान हिंगोणा, संस्था सदस्य बंटी भाऊ आंबेकर,प्रेस फोटोग्राफर मिलिंद महाजन, पत्रकार संस्था सदस्य देवेंद्र झोपे सर इत्यादी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.सुत्रसंचालन संदिप धर्मराज पाटील यांनी तर आभार फारुक शेख यांनी मानले.
पत्रकार संस्थेच्या वतीने सर्व कार्यालयांना देणार आचार्य जांभेकरांची प्रतिमा
    पत्रकार संस्था फैजपूर तर्फे २० फेब्रुवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व महत्त्वाच्या कार्यालयांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा संस्थेच्या वतीने भेट देणार असल्याची घोषणा यावेळी अध्यक्ष फारुख शेख यांनी केली.महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण ऐतिहासिक महापुरुषांच्या यादित आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव समाविष्ट केले असुन पत्रकार बांधवांच्या अनेक वर्षांपासून ची मागणी पुर्ण झाली आहे त्याबद्दल पत्रकार संस्था फैजपूर, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव वतीने संदिप पाटील यांनी आभार व्यक्त केले.याप्रसंगी लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत सर यांनीदेखील मनोगत व्यक्त करुन पत्रकारीतेचे महत्व विशद केले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व