वाळुमाफीयांनी फैजपूर प्रांताधिकारी कडलग यांना जिवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

वाळुमाफीयांनी फैजपूर प्रांताधिकारी कडलग यांना जिवे ठार मारण्याचा केला प्रयत्न
अधिकार्यांचा वाळुमाफीयांना असलेला (अर्थ) पुर्ण पाठिंबा बेतला जिवावर?

फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर परिसरात वाळुमाफीयांची गुंडगिरी इतकी वाढली आहे की काल रात्री अवैध वाळू वाहतूक करतांना चक्क प्रांताधिकार्यांवरच वाळुचे डंपर चालवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.परंतु या सर्व प्रकाराला स्वतः प्रांताधिकारी, तहसिलदार व त्यांचे स्वयंघोषित दलाल हेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे
         याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.२४ फेब्रुवारी रोजी १० वाजून ४७ मिनिटांनी सहाय्यक जिल्हाधिकारी जळगाव तथा उपविभागीय अधिकारी जळगाव तृप्ती धोंडमिसे यांनी फैजपूर प्रांताधिकारी श्री.कैलास कडलग यांना दिलेल्या माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जळगाव उपविभागातुन हुलकावणी देऊन फैजपूर उपविभागात गेले असल्याचे सांगितले.त्यानुसार फैजपूर प्रांताधिकारी कडलग हे त्यांचे शासकीय वाहन क्र.एम एच १९ एम ०७०८ घेऊन चालक उमेश तळेकर यांचेसह जात असतांना न्हावी गावाकडे एक डंपर वेगाने जात असल्याचे दिसून आल्याने प्रांताधिकारी कडलग यांनी सदर डंपरचा पाठलाग सुरू केला व डंपर चालक महेंद्र तायडे (रा.कोळन्हावी) याला डंपर थांबविण्याचे सांगितले.परंतु त्यांने डंपर न थांबवता प्रांताधिकार्यांच्या शासकीय वाहनाला डंपरने धडक देऊन प्रांताधिकारी कैलास कडलग व चालक उमेश तळेकर यांना जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला.या घटनेत प्रांताधिकारींचे वाहनचालक तळेकर हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्रांताधिकारी कडलग व वाहन चालक तळेकर यांचा जीव वाचला आहे.
अधिकार्यांना ठार करण्याच्या प्रयत्नापर्यंत वाळुमाफीयांची मजल गेली तरी कशी?
      आजपर्यंत चोरुन वाळु वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांनी चक्क प्रांताधिकार्यांवरच वाळुचे डंपर चालवून जिव घेणा हल्ला केला आहे.पण अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांची आज प्रांताधिकारीचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत हिंमत वाढली कशी? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

बाहेरील डंपर वर कारवाई आणि स्थानिक वाळुमाफीयांना मात्र यंत्रणेचे अभय?
   सदर डंपरने चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव उपविभागीय अधिकारी यांनी फैजपूर उपविभागीय अधिकारी कडलग यांना दिली त्यावरुन प्रांताधिकारी कडलग यांनी सदर डंपरचा पाठलाग केला.पण जर का जळगावच्या अधिकार्यांनी फैजपूर प्रांताधिकारींना कळवले नसते तर कदाचित ही कारवाई झाली नसती की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रांताधिकारी,तहसिलदार यांना माहीती देऊनही करतात दुर्लक्ष
       दरम्यान याबाबत फैजपूर येथील पत्रकार फारुक शेख यांनी १०-१२ दिवसांपूर्वी यावलचे तहसिलदार पवार व प्रांताधिकारी कडलग साहेब यांना अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी विनंती केली होती.त्यावर तहसिलदार पवार यांनी लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.पण प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई झाली नाही उलट वाळुमाफीयांची मुजोरी जास्त प्रमाणात वाढली असुन त्यावेळीच तहसिलदार पवार व प्रांताधिकारी कडलग यांनी कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती.

स्थानिक अधिकाऱ्यांचे वाळुमाफीयांसोबत अर्थपुर्ण संबंध?

   फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी श्री.कडलग साहेब व यावलचे तहसिलदार श्री.पवार साहेब यांनी या विभागात पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांचे प्रमाण जास्तच वाढले असून रोज रात्री २५ ते ३० डंपर व ट्रॅक्टर वाळु फैजपूर व परिसरात दाखल होत आहे.
      या परीसरात डंपरने अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती जळगावचे प्रांताधिकारी येऊन फैजपूर प्रांताधिकारींना सांगतात तोपर्यंत स्थानिक पातळीवरील अधिकारी काय झोपा काढतात का? की डोळे झाकुन व कानावर हात ठेवून झोपेचं सोंग घेत आहेत? त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत असताना त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखले आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून या सर्व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळुमाफीयांचे व अधिकार्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चकरा मारणार्या स्वयंघोषित दलालांचा देखील यात अर्थपूर्ण सहभाग आहे असं देखील बोलले जात आहे.
वाळुमाफीयांनी प्रांताधिकार्यांवर केलेल्या जिवघेण्या हल्ल्याविरोधात महसुलचे पोलीस अधिकारींना निवेदन
दि.२४ रोजी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई साठी गेलेल्या फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग साहेब व वाहनचालक उमेश तळेकर यांच्या शासकीय वाहनाला वाळुमाफीयांनी डंपरने धडक देऊन जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला.यामध्ये चालक तळेकर हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.यामधे प्रांताधिकारी कडलग साहेब व चालक तळेकर हे सुदैवाने थोडक्यात बचावले असुन वाळुमाफीयांच्या या गुंडगिरी व मुजोरीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पिंगळे साहेब यांना सामुहिक निवेदन दिले आहे.सदर घटनेत प्रत्यक्ष सहभागी असलेले व त्यांना पाठबळ देणाऱ्या अशा सर्व गुन्हेगारांना त्वरीत करुन घेऊन त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत तत्काळ कारवाई करावी जेणेकरून काम करणाऱ्या क्षेत्रीय यंत्रणेचे मानसिक खच्चीकरण करणार्या प्रवृत्तीला आळा बसुन यंत्रणेचे मनोधैर्य वाढेल असे निवेदनात म्हटले आहे.
   यावेळी फैजपूर उपविभागातील सर्व तहसिलदार व नायब तहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी कर्मचारी संघटना,वाहन चालक संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना तसेच कोतवाल कर्मचारी संघटना या सर्वांनी मिळून हे निवेदन दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व