मौलाना अबुल कलाम आझाद पुण्यतिथीनिमित्त फैजपूर पत्रकार संस्था कार्यालयात अभिवादन
फैजपूर प्रतिनिधी: स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त फैजपूर येथे राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडी जळगाव जिल्हा तर्फे मौलाना अबुल कलाम आझाद व्यापारी संकुल येथे पत्रकार संस्था कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अन्वर खाटिक व राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाउपाध्यक्ष शेख शाकीर यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष साजीद शेख हमीद मेंबर, सुपर ऑटोचे संचालक अब्दुल रज्जाक, समाजसेवक युनुस खान, पत्रकार संस्था फैजपूर अध्यक्ष फारुक शेख, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहराध्यक्ष शेख इलियास टेलर,अज्जु शेख मुश्ताक इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment