दसनूर येथे सही पोषण देश रोषन अंतर्गत पोषण माह चा समारोप
सही पोषण देश रोषन अंतर्गत पोषण माह चा दसनूर येथे समारोप दसनूर प्रतिनिधी : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रावेर १ अंतर्गत निंभोरा बीट मधील दसनूर अंगणवाडी येथे सही पोषण देश रोषन अभियानाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी पोषण माह अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत दसनूर अंगणवाडी येथे राबविण्यात आलेल्या विविध ८० उपक्रमांची माहिती देण्यात आली.तसेच कार्यक्रमात गरोदर मातांना बेबीकिट व कुपोषित बालकांना मान्यवरांच्या हस्ते पोषक आहार वाटप करण्यात आले.गावातील मुलींसाठी कडधान्याची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते तीन मुलींना उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर पंचायत समितीच्या मा.उपसभापती अनिता महेश चौधरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे,प्रकल्प अधिकारी-२ श्रीमती जे के तायडे, पर्यवेक्षीका श्रीमती एस बी तडवी, श्रीमती एस डी चौधरी, श्रीमती एस डी दडमल, प्रकल्प २ च्या पर्यवेक्षीका श्रीमती सुरक्ष...