आ.मंगेश चव्हाणांच्या पाठपुराव्याने ०२ हजार लसींचे जंबो शिबिराचे आयोजन
चाळीसगाव प्रतिनिधी: मिशन कोरोनामुक्त चाळीसगाव अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील जनतेला कोविड वॅक्सीन उपलब्ध करून देत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने आज चाळीसगाव येथे जवळपास २ हजार लसींचे जंबो लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर येथील तेली समाज मंगल कार्यालयात दिनांक ०४ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी ०८ वाजेपासून या लसीकरण शिबिराला सुरुवात होणार आहे. नागरिकांनी येतांना सोबत आधार कार्ड व ओटीपी साठी मोबाईल आणावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा आमदार मंगेशदादा चव्हाण व मित्र परिवार यांनी केले आहे.लसीकरण टोकन पद्धतीने होणार असून प्रथम येणाऱ्या २००० व्यक्तींनाच या लसीकरण शिबिराचा लाभ मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Comments
Post a Comment