चाळीसगाव येथे ०६ हजार लसींचे दोन दिवसीय जंबो शिबिर-आ.मंगेशदादा चव्हाण,भाजपा व आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य
आमदार मंगेशदादा चव्हाण,भाजपा व आरोग्य विभागाचे विशेष सहकार्याने आयोजन
संदिप पाटील चाळीसगाव : मिशन कोरोनामुक्त चाळीसगाव अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील जनतेला कोविड वॅक्सीन उपलब्ध करून देत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने आज व उद्या दोन दिवस ०६ हजार लसींचे जंबो लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर येथील तेली समाज मंगल कार्यालयात दिनांक ०८ व ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ०९ वाजेपासून या लसीकरण शिबिराला सुरुवात होणार आहे. हे शिबिर दिवसभरात तीन सत्रात होणार असून प्रथम सत्र सकाळी ०९ ते १२ दुसरे सत्र दुपारी १२ ते ०३ आणि तिसरे दुपारी ०३ ते ०६ असे होणार आहे. नागरिकांनी येतांना सोबत आधार कार्ड व ओटीपी साठी मोबाईल आणावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी चाळीसगाव, आमदार मंगेशदादा चव्हाण मित्र परिवार व आरोग्य विभाग यांनी केले आहे.
सदर शिबिराच्या ठिकाणी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व स्वयंसेवक यांच्यामार्फत रजिस्ट्रेशन करुन टोकन वाटप केले जाणार असून नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या टोकन वरील दिनांक व दिलेल्या वेळेनुसार लस घेण्यासाठी हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment