सावधान: पुराचा धोक्याचा इशारा

मन्याड धरणाच्या समादेश क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्यूसेक्स पाण्याचा प्रवाह रात्री दोन ते अडीच वाजता मन्याड धरणातून पास होत आहे या कारणाने गिरणा नदीत पूर परिस्थिती निर्माण होणार आहे

चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण पूर्ण क्षमतेने भरले असून मागील  पंधरवड्यापासून त्यामधून पाणी सोडले जात आहे. काल रात्री मन्याड धरणाच्या वरील बाजूस ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून 100000  क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी वाहत आहे हे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे या कारणाने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे.
         या कारणाने चाळीसगाव भडगाव पाचोरा जळगाव तालुक्यातील नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहेमन्याड धरण व गिरणा पात्रातील पावसामुळे आलेला पूर यामुळे जामदा बंधार्‍यावरून जवळपास दीड लाख क्युसेक्स पाणी पास होणार आहे. बहुळा व हिवरा धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामधून दहा हजार पेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे गिरणा नदीवर काठावरील सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत होती कोणीही नदी पात्रात जाऊ नये गुरेढोरे चारा जळतं सामान तसेच शेतीचे अवजारे इत्यादी तसेच नदी काठावरील रहिवास तात्पुरते खळे यामधील सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे प्रशासनाने व स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांना आपल्या कर्मचाऱ्यांना मार्फत अवगत करून त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी होणार नाही असे कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व