सुवर्णसंधी:. स्वस्त फोनचा मस्त सेल सुरू,आजच बुक करा हा मोबाईल

सुवर्णसंधी:. स्वस्त फोनचा मस्त सेल सुरू,आजच बुक करा हा मोबाईल

नवी दिल्लीः स्मार्टफोन क्षेत्रातील नामवंत कंपनी शाओमीने गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Redmi 10 Prime लाँच केला होता. रेडमी १० प्राइम गेल्या वर्षी लाँच झालेल्या रेडमी ९ प्राइमचे अपग्रेडेड स्मार्टफोन आहे. रेडमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेराचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. रेडमी १० प्राइमचा आज सेल अमेझॉन इंडियावर सुरू झाला आहे.

Redmi 10 Prime ची किंमत

Redmi 10 Prime च्या ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १२ हजार ४९९ रुपये तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १४ हजार ४९९ रुपये आहे. फोनची विक्री अमेझॉन, मी डॉट कॉम, मी स्टूडिओज आणि मी होम स्टोर्सवर आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. या फोनला व्हाइट, ब्लॅक, आणि ब्लू कलर मध्ये खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व ईएमआय द्वारे फोन खरेदीवर ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन

रेडमीच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 2,400 X 1,080 पिक्सल दिला आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ३ दिला आहे. रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज दिला आहे. हँडसेट मध्ये मीडियाटेक हीलियो जी ८८ प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी माली-G52 MC2 जीपीयू दिला आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येवू शकते. फोन 11 बेस्ड MIUI 12.5 कस्टम स्किन सोबत येतो. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम एक्सटेंड केले जावू शकते.
         या फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने बॉक्स मध्ये २२.५ W अडेप्टर सोबत दिले आहे. फोन 9W रिवर्स चार्जिंग सपॉर्ट करतो. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिले आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व