Posts

Showing posts from February, 2022

खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी,सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवजयंती उत्सवाला सर्व स्तरांतून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवजयंती उत्सवाला सर्व स्तरांतून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद फैजपूर प्रतिनिधी : बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फैजपूर शहरातील सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मीय शिवप्रेमींनी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.         यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते व मा.प्रदेश सदस्य भास्कर काशिराम चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटूभाऊ) राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, भाजपा फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहते, काँग्रेसचे नगरपरिषद गटनेते कलीम खान मन्यार, शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक अमोल निंबाळे, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,फैजपूर पोलीस स्टेशन चे स.पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर साहेब, पीएसआय मोहन लोखंडे साहेब,कामगार नेते किरण ओंकार चौधरी, निलेश दुसाने,मेहतर समाज शहराध्यक्ष व माजी ...

लोंढे येथे संत रोहिदास महाराज जयंती आ.मंगेश चव्हाण आणि प्रा.सुनिल निकम यांच्या उपस्थितीत उत्‍साहात संपन्‍न

Image
लोंढे येथे संत रोहिदास महाराज जयंती आ.मंगेश चव्हाण आणि प्रा.सुनिल निकम यांच्या उपस्थितीत उत्‍साहात संपन्‍न चाळीसगाव प्रतिनिधी: बुधवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोंढे ता.चाळीसगाव येथे संत रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आली.      याप्रसंगी आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की... संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी स्वकर्तृत्वाला व कर्माला महत्त्व दिले त्यानुसार आपण सुद्धा आपल्या कर्माला महत्त्व दिले पाहिजे. आपण संत शिरोमणी रोहिदास महाराज  यांच्या उपदेशाचे आचरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी तरुणांना केले...." मन चंगा तो कटौती में गंगा" या म्हणीचा अर्थ समजावून सांगताना त्यांनी सांगितले की ..आपले मन पवित्र असेल ,अंतकरण शुद्ध असेल तर गिरणामाता आपल्याला आपल्या कर्माच्या ठिकाणी साध्य/प्राप्त होऊ शकते.कर्माला महत्त्व दिले पाहिजे ही संत शिरोमणी रोहिदास महाराजांची शिकवण आपण अंगिकारावी असे आवाहन आमद...

आ.मंगेश चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा यांच्या मुलींच्या लग्नात दिला २५ हजारांचा आहेर

Image
आ.मंगेश चव्हाण यांचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा यांच्या मुलींच्या लग्नात दिला २५ हजारांचा आहेर सावित्रीबाई फुले शुभमंगल योजना स्वखर्चाने केली सुरू; शासनाने राज्यस्तरावर राबवावी- समाजमाध्यमातून मागणी चाळीसगाव प्रतिनिधी:   तालुक्यातील १३०० हुन अधिक संख्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना मी माझी बहिण मानले आहे. म्हणून त्यांच्या एका मुलीच्या लग्नाला मामा या नात्याने २५ हजार रुपयांची मदत करण्याचा शब्द चाळीसगाव तालुक्याचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या भाऊबीज सोहळ्यात दिला होता. दिलेला शब्द पाळत दि.५,६ व ७ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध ठिकाणी पार पडलेल्या तिरपोळे, वलठाण, ओझर येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मुलींच्या विवाह सोहळ्याला आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी भेट देऊन प्रत्येकी २५ हजार प्रमाणे एकूण ७५ हजारांचा आहेर भेट दिला व आपले मामा म्हणून कर्तव्य पार पाडले.         सदर विवाह सोहळ्याप्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, कृष...

महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण, हळदीकुंकू व सॅनिटरी नॅपकिन चे वाटप

Image
महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण, हळदीकुंकू  व सॅनिटरी नॅपकिन चे वाटप जळगाव प्रतिनिधी: दिनांक ०७/०२/२०२२ रोजी महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांत रथसप्तमी निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम रामानंद नगर श्रीराम मंदिर ठिक ३:३० वाजता येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.        या प्रसंगी प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, डॉ हर्षदा गणेश पाटील, अध्यक्षा मनिषा पाटील, डॉ नयना झोपे, सामाजिक कार्यकर्त्या भारती कुमावत, शहराध्यक्ष नेहा जगताप व  उपस्थित होत्या. यावेळी महापौर जयश्री ताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यात विविध वृक्ष लागवड बेहडा, आंबा, काशीद,बाभूळ, पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यातआली. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी वृक्षरोपण आणि हळदी कुंकू यांचे स्रीच्या जीवनात कसें महत्व आहे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले आणि म पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांनी आणलेले ...

जेबीएम सोलार कंपनीतील 'त्या' ४० कामगारांना कायम सेवेत घ्या; भाजपा व कामगारांनी दिले निवेदन

Image
जेबीएम सोलार कंपनीतील 'त्या' ४० कामगारांना कायम सेवेत घ्या; भाजपा व कामगारांनी दिले निवेदन चाळीसगाव प्रतिनिधी: जेबीएम सोलार ग्रुप मध्ये स्थानिक कामगारांना कायम ठेवत त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय तसीलदार साहेब श्री अमोलजी मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव ,मा. खासदार श्री. उन्मेषदादा पाटील ,मा.आमदार श्री मंगेशदादा चव्हाण आणि जे बी म सोलार ग्रुपचे मॅनेजर साहेब यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या.         सन 2018-19 पासून ज्या कर्मचाऱ्यांनी सोलर कंपनी उभारणीमध्ये आपले योगदान दिलं. जे आजपर्यंत इमानेइतबारे प्रामाणिकपणे काम करत आहेत, सेवा देत आहेत ,त्या कर्मचाऱ्यांना सेवेत नवीन एजन्सीने कायम ठेवावे. इतर पद भरती करताना स्थानिक कर्मचार्‍यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. आणि जर  या ४० कर्मचार्‍यांवर अन्याय झाला ,त्यांना नोकरीतून काढण्यात आले तर मात्र भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. आंदोलन, उपोषणाचा मार्ग पत्कर...