जेबीएम सोलार कंपनीतील 'त्या' ४० कामगारांना कायम सेवेत घ्या; भाजपा व कामगारांनी दिले निवेदन
चाळीसगाव प्रतिनिधी: जेबीएम सोलार ग्रुप मध्ये स्थानिक कामगारांना कायम ठेवत त्यांच्यावर अन्याय न करता त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय तसीलदार साहेब श्री अमोलजी मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव ,मा. खासदार श्री. उन्मेषदादा पाटील ,मा.आमदार श्री मंगेशदादा चव्हाण आणि जे बी म सोलार ग्रुपचे मॅनेजर साहेब यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या.
सन 2018-19 पासून ज्या कर्मचाऱ्यांनी सोलर कंपनी उभारणीमध्ये आपले योगदान दिलं. जे आजपर्यंत इमानेइतबारे प्रामाणिकपणे काम करत आहेत, सेवा देत आहेत ,त्या कर्मचाऱ्यांना सेवेत नवीन एजन्सीने कायम ठेवावे. इतर पद भरती करताना स्थानिक कर्मचार्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. आणि जर या ४० कर्मचार्यांवर अन्याय झाला ,त्यांना नोकरीतून काढण्यात आले तर मात्र भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. आंदोलन, उपोषणाचा मार्ग पत्करेल असा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री केबी दादा साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर ,जेडीसीसी बँकेचे मा. संचालक श्री राजूभाऊ राठोड, भाजपा वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. रवींद्र मराठे ,अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा महिला अध्यक्ष रिजवाना ताई खान ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल पवार, अनुसूचित जाती मा. जिल्हा सरचिटणीस श्री स्वप्निल भाऊ मोरे ,सरचिटणीस श्री योगेश भाऊ खंडेलवाल, युवा मोर्चा जिल्हा ओबीसी पदाधिकारी हर्शल भाऊ चौधरी ,ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष धनंजय भाऊ सूर्यवंशी, राजेंद्रजी गवळी ,बारा बलुतेदार आघाडी भाजपा तालुका अध्यक्ष श्री तुषार सूर्यवंशी सर ,ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी श्री राजेंद्र भाऊ पगार, बारा बलुतेदार आघाडी तालुका चिटणीस श्री प्रशांत शेवरे ,उत्तम पाटील, अर्जुन गोपाळ ,ज्येष्ठ भाजपा पदाधिकारी श्री सुभाष बजाज ,अनंत माळी, गोरख चव्हाण, अमोल घाडगे, चंद्रभान देशमुख ,गणेश भोसले, विजय राठोड ,प्रशांत बच्छाव, किरण राठोड ,शिवराज पाटील, संतोष चव्हाण, विकास चव्हाण, निवृत्ती माळी ,कांतीलाल राठोड, आयुब पठाण ,आसिफ शेख व इतर भाजपा पदाधिकारी आणि जेबीएम सोलर ग्रुपचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment