लोंढे येथे संत रोहिदास महाराज जयंती आ.मंगेश चव्हाण आणि प्रा.सुनिल निकम यांच्या उपस्थितीत उत्‍साहात संपन्‍न

लोंढे येथे संत रोहिदास महाराज जयंती आ.मंगेश चव्हाण आणि प्रा.सुनिल निकम यांच्या उपस्थितीत उत्‍साहात संपन्‍न

चाळीसगाव प्रतिनिधी: बुधवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोंढे ता.चाळीसगाव येथे संत रोहिदास महाराज मित्र मंडळाच्या वतीने संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
     याप्रसंगी आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की... संत शिरोमणी रोहिदास महाराज यांनी स्वकर्तृत्वाला व कर्माला महत्त्व दिले त्यानुसार आपण सुद्धा आपल्या कर्माला महत्त्व दिले पाहिजे. आपण संत शिरोमणी रोहिदास महाराज  यांच्या उपदेशाचे आचरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी तरुणांना केले...." मन चंगा तो कटौती में गंगा" या म्हणीचा अर्थ समजावून सांगताना त्यांनी सांगितले की ..आपले मन पवित्र असेल ,अंतकरण शुद्ध असेल तर गिरणामाता आपल्याला आपल्या कर्माच्या ठिकाणी साध्य/प्राप्त होऊ शकते.कर्माला महत्त्व दिले पाहिजे ही संत शिरोमणी रोहिदास महाराजांची शिकवण आपण अंगिकारावी असे आवाहन आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण यांनी केले.लोंढे गावाच्या आणि पंचक्रोशीच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे असे आश्वासन त्यांनी दिले. चिंचगव्हानचे सरपंच श्री. सुभाष राठोड सर यांनी आपल्या मनोगतात..संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा जीवनपट त्यांची शिकवण आणि आजच्या तरुणांनी घ्यायचा उपदेश यावर मार्गदर्शन केले.
         लोंढे गावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी आपल्या मनोगतात संत शिरोमणी रोहिदास महाराज आणि एक साधू महात्म्य आणि गंगा मातेचा एक प्रसंग कथित केला .त्याचप्रमाणे आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी लोंढे गावासाठी तलाठी कार्यालय ,पाणीपुरवठा योजना, कृष्णापुरी, दरातांडा ,विसापूर ,रामनगर दरेगाव ,चिंचगव्हाण खडकीसिम,धामणगाव, शिदवाडी,मेहुणबारे, वरखेडे, तिरपोळे, भऊर ,जामदा या पंचक्रोशीतील गावांसाठी विकासकामे प्रस्तावित केले म्हणून त्यांचे आभार मानले आणि भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीला निधी मिळवून द्यावा अशी विनंती केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश अहिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लोंढे गावाचे माजी सरपंच डॉक्टर श्री. रमेश निकम यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे बुथ प्रमुख,शक्तीकेंद्र प्रमुख ,गणप्रमुख ,गट प्रमुख त्याचप्रमाणे सरपंच ,उपसरपंच हजर होते.
         याप्रसंगी नगरसेवक श्री. नितीनभाऊ पाटील ,श्री.सदानंद भाऊ चौधरी ,शहर सरचिटणीस श्री. जितुभाऊ वाघ ,मेहुणबारे गणाचे पंचायत समिती सदस्य श्री. पियुष साळुंखे ,गटप्रमुख श्री सुनिल पवार ,लोंढे गावाचे सरपंच श्री. हिरामण सोनवणे, रामनगरचे मा. सरपंच श्री दशरथ जाट, चिंचगव्हानचे सरपंच श्री. सुभाष राठोड, दहिवदचे सरपंच श्री. नवल पवार ,शिदवाडीचे उपसरपंच श्री. घन :शाम पाटील, धामणगावचे मा. सरपंच श्री. सुनिल पवार .पळासरेचे सरपंच श्री. उत्तम तिरमली, लोंढे गावाचे उपसरपंच श्री. जयसिंगदादा भोसले,रामनगर चे बुथ प्रमुख श्री कोमल जाट,श्री.सुरेश जाट ,विसापूरचे बुथप्रमुख श्री पोपट वाघ, युवा मोर्चा तालुका चिटणीस श्री.समाधान निकम, कृष्णापुरीचे बूथ प्रमुख श्री. कांतीलाल जाधव ,युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी श्री. राजूभाऊ शेख ,ग्रामपंचायत सदस्य श्री. निवृत्ती जाधव ,रूपेश जाधव, राजूभाऊ पवार ,आबा निकम ,साहेबराव निकम ,भाजपा व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्ष श्री. जिभाऊ चौधरी, श्री.भैय्यासाहेब देवरे ,जिल्हा पदाधिकारी श्री.सुरेशजी पगारे, लोंढे गावाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. सुरेश आप्पा निकम, श्री संजू आबा फौजी ,श्री नानाभाऊ राणे, श्री वाल्मिक अहिरे ,अण्णा अहिरे ,श्री सुभाष अहिरे ,मार्केट कमिटी संचालक श्री दणके नाना ,चिंचगव्हाणचे शक्ती केंद्रप्रमुख श्री भोला पाटील, श्री प्रविण चौधरी,श्री. भैय्या जाट, श्री शुभम साळुंखे ,पोलीस पाटील, छबू पाथरे, सुनील राणे ,भानुदास भोसले ,लोंढे गावातील ज्येष्ठ मंडळी, माता-भगिनी, तरुण मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व