खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी,सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवजयंती उत्सवाला सर्व स्तरांतून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्वपक्षीय, सर्वधर्मीय शिवजयंती उत्सवाला सर्व स्तरांतून लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद
फैजपूर प्रतिनिधी: बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त फैजपूर येथे दिपाली गृप्स कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फैजपूर शहरातील सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मीय शिवप्रेमींनी उपस्थित राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते व मा.प्रदेश सदस्य भास्कर काशिराम चौधरी, माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटूभाऊ) राणे, माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, भाजपा फैजपूर शहराध्यक्ष अनंता नेहते, काँग्रेसचे नगरपरिषद गटनेते कलीम खान मन्यार, शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक अमोल निंबाळे, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे,फैजपूर पोलीस स्टेशन चे स.पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर साहेब, पीएसआय मोहन लोखंडे साहेब,कामगार नेते किरण ओंकार चौधरी, निलेश दुसाने,मेहतर समाज शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय राल,ग्राहक संरक्षण संघटनेचे निलेश आमोदकर, संजय गांधी निराधार समिती चे सदस्य नितीन महाजन, दिव्यांग सेनेचे नाना भाऊ मोची, विधिज्ञ ॲड.आकाश चौधरी, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रजनीताई चौधरी, ॲड. हेमांगी चौधरी, भारती पाटील, आरती सोनार, पल्लवी सोनार, काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख गणेश गुरव सर, भाजपा शहर सरचिटणीस संजय सराफ, युवा मोर्चा शहराध्यक्ष शाम भंगाळे, जितेंद्र चौधरी सर, छोटू कुलकर्णी,छावा मर्दानी खेळ आखाडा अध्यक्ष महेश वघोदेकर, प्रशांत चौधरी, सोहम चौधरी, अक्षय परदेसी, सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी, अशोक धांडे गुरुजी, हिमांशू चौधरी, रोशन राणे, युवराज चौधरी, देवेंद्र झोपे सर इत्यादी अनेक पदाधिकारी, शिवप्रेमीं उपस्थित होते.
Comments
Post a Comment