महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण, हळदीकुंकू व सॅनिटरी नॅपकिन चे वाटप

महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण, हळदीकुंकू  व सॅनिटरी नॅपकिन चे वाटप

जळगाव प्रतिनिधी: दिनांक ०७/०२/२०२२ रोजी महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांत रथसप्तमी निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम रामानंद नगर श्रीराम मंदिर ठिक ३:३० वाजता येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 
      या प्रसंगी प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, डॉ हर्षदा गणेश पाटील, अध्यक्षा मनिषा पाटील, डॉ नयना झोपे, सामाजिक कार्यकर्त्या भारती कुमावत, शहराध्यक्ष नेहा जगताप व  उपस्थित होत्या. यावेळी महापौर जयश्री ताई महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यात विविध वृक्ष लागवड बेहडा, आंबा, काशीद,बाभूळ, पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यातआली. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी वृक्षरोपण आणि हळदी कुंकू यांचे स्रीच्या जीवनात कसें महत्व आहे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले आणि म पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती ग्रुप जळगाव यांनी आणलेले हळदी कुंकू वाण म्हणजे सॅनिटरी नॅपकीन पैड वाटण्यात आले त्याबद्दल देखील कौतुक केले. तसेच प्रमूख अतिथी डॉ हर्षदा पाटील  यांनी मासिक पाळी यावर समस्या त्यांची कारणे, उपाय यावर मार्गदर्शन करून सर्व महिलांचे प्रश्न जाणून हितगुज साधले, डॉ नयना झोपे यांनी पर्यावरण व सॅनिटरी नॅपकीन पैडची विल्हेवाट योग्य पद्धतीने कशी करावी यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रत्येक सखीला हळदीकुंकू देऊन सॅनिटरी नॅपकीन पैडचे वाण देण्यात आले. मासिक पाळी व त्याबाबतीत अंधश्रध्दा यांचेही निर्मूलन करण्या उद्देशाने श्री राम मंदिर येथे हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती ज्योती राणे यांनी सूत्रसंचलन केले. आभार सुमित्रा पाटील यांनी मानले.
       यावेळी नूतन तासखेडकर, रेणुका हींगू, जळगाव ग्रामीण पर्यावरण सखी मंच अध्यक्ष मनिषा शिरसाठ छाया पाटील,  अर्चना महाजन, रुद्रानी देवरे, निशा चौधरी, ज्योती वाघ ,छाया पाटील  , मंगला उबाळे ,एडवोकेट श्रद्धा काबरा, एडवोकेट वैशाली बोरसे, जागृती चौधरी, सुनिता पाटील उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व