फैजपूरचा 'पारस' बनला बालवैज्ञानिक, गांधी रिसर्च फाउंडेशन च्या स्पर्धेत सादर केले संशोधन
प्रतिनिधी (संदिप पाटील): गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत घेण्यात येणार्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेत फैजपूर येथील चि.पारस सचिन चौधरी या पाचवीतील विद्यार्थ्याने लाखो लोकांचे जीव वाचवण्यासाठी केलेले संशोधन सादर केले असुन ही स्पर्धा आॅनलाईन स्वरुपात घेण्यात येत आहे.
रेल्वे क्रॉसिंग वर रेल्वे रुळ ओलांडताना हजारो लोकं मृत्यूमुखी पडतात तर लाखो जखमी होतात.या सर्व घटनांचा अभ्यास करून या छोट्या मुलाने एक संशोधन केलेले असुन चि.पारस लाखो लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न आपल्या या संशोधनातुन करु इच्छित आहे.
सदर स्पर्धेत आॅनलाईन लाईक व शेअर करुन चि.पारस ला वोटिंग करुन त्याचा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर पोहचवा असे आवाहन फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले आहे.त्यासाठी आज शेवटचा दिवस असुन https://youtu.be/N8tJuB4TfLQ या युट्यूब व https://m.facebook.com/story.php?story_fbid=3784771558255311&id=387952851270549&sfnsn=wiwspwa या फेसबुक लिंक वर जाऊन आपण सर्वांनी त्याला लाईक, कमेंट व शेअर करुन पाठिंबा दर्शवावा व आपल्या फैजपूर परीसरातुन संशोधक तयार होण्यासाठी योगदान द्यावे असे देखील यावेळी सौ.दिपाली चौधरी यांनी सांगितले.
Congratulations
ReplyDeleteCongratulations Paras
ReplyDeleteChhan
ReplyDeleteBest of Luck Paras.
ReplyDelete