चाळीसगाव प्रतिनिधी (किशोर शेवरे): चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा पिराचे या ठिकाणी गुरुकुल इंग्लिश स्कूल मध्ये दि २४ डिसेंबर रोजी आनंदमेळावा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला मुलांना व्यापार व्यवसायातील देवाण घेवानीचे आवड निर्माण व्हावी हा कार्यक्रमाचा हेतू होता त्या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक ह.भ.प.पंडीत सुर्यवंशी,उषाबाई सुर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, अंनत पाटील,निलकंठ पाटील,माया मेडीकलच्या संचालिका,शंकर जैन,अल्केश जैन,गिरीष जैन,अरुण पाटील,सारंग पाटील,नितीन जैन, संदीप पाटील,अनिल गुंजाळ,शेलार बाबा,आदी उपस्थीत होते.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन गुरुकुलच्या प्राचार्या सौ. हर्षदा मँडम यांनी केले.तर,विद्यार्थीना खरेदी विक्री कशी करावी याविषयी मार्गर्दशन आश्वनी मँडम,दिपाली मँडम यांनी केले.तर सर्व पालक विद्यार्थी,शिक्षकांचे यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष तुषार सुर्यवंशी यांनी मानले त्या वेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.