चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या ओपन जिमचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
चाळीसगाव प्रतिनिधी: फिट चाळीसगाव हा उद्देश घेऊन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून काल रविवार रोजी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या वतीने चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मोठे कॉलेज ट्रॅक ग्राउंड येथे बसविण्यात आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील सर्वात पहिल्या १६ स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम चे लोकार्पण करण्यात आले.
नागपूर येथील दीपेश फॅब्रिकेशन अँड स्पोर्ट्स या कंपनीने बनविलेल्या या ओपन जिम मुळे सैन्यभरती, पोलीस भरती करणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील तरुण तरुणींना एकाच ठिकाणी १६ प्रकारचे व्यायाम करता येणार आहे.
याठिकाणी संस्थेने व क्रीडाप्रेमींनी केलेल्या मागणीची दखल घेत सदर ट्रॅक ग्राउंड येथील धावपट्टीवर तात्काळ स्वखर्चाने लाल माती टाकण्याच्या सूचना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिल्या तसेच सदर ग्राउंड वर असणाऱ्या अंधारामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची व क्रीडाप्रेमींची होणारी गैरसोय लक्षात घेता त्याठिकाणी आमदार निधीतून १० हायमास्ट लाईट बसविण्यात येतील असे आश्वासन देखील आ.चव्हाण यांनी यावेळी दिले.
भल्या पहाटे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यसह चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बॉडीचे चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल, अध्यक्ष आर.सी.पाटील सर, संस्थेचे सचिव डॉ.विनोदजी कोतकर, कनकसिंग राजपूत सर, सुरेश भाऊ सर, डी. आर.दादा चौधरी, योगेशभाऊ अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंदजी देशमुख, भोजराज शेठ पुंशी, निलेश छोरिया, जितेंद्र वाणी, योगेश करंकाळ, कॉलेजचे प्राचार्य मुकुंद बिल्दीकर सर, यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती माजी सभापती संजय भास्करराव पाटील, माजी नगरसेवक गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नेते विश्वासभाऊ चव्हाण, युवा मोर्चाचे कपिल पाटील, पालवे वकील, सदानंद भाऊ चौधरी, प्रभाकर चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.संगीताताई गवळी, बापू अहिरे, कैलास नाना पाटील, एड.कैलास आगोणे, प्रकाश पवार सर, राजुभाऊ पगार, भावेश कोठावदे, अजय वाणी, भूषण पाटील, दीपेश फेब्रिकेशन व स्पोर्ट्सचे आशिष मेरखेड, किरण पाटील सर, काटे सर, संस्थेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
Comments
Post a Comment