पोलीस पाटलांच्या संघटनेने काढला नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा: आ.मंगेश चव्हाण यांनी घेतली मोर्चेकऱ्यांची भेट


नागपूर प्रतिनिधी: आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी राज्यातील पोलीस पाटील संघटनांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला राज्य सरकारच्या वतीने आ.मंगेश चव्हाण हे प्रातिनिधिक स्वरूपात सामोरे गेले व त्यांनी पोलीस पाटील संघटनांच्या मागण्या व समस्या समजून घेत मोर्चाला संबोधित केले.
             यावेळी बोलतांना आ.मंगेश चव्हाण म्हणाले की पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील जनता व पोलीस प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोविड काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता गावाच्या रक्षणासाठी ते कायम पुढे राहिले असल्याचे मी स्वतः माझ्या चाळीसगाव मतदारसंघात बघितले आहे. 
        मात्र मिळणारे अतिशय अल्प मानधन व शासनाकडून कुठल्याही भरीव सुविधा त्यांना मिळत नसल्याने देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१९ मध्ये पोलीस पाटील यांचे मानधन ३००० वरून दुप्पट ६५०० करण्यात आले होते मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आता गृहमंत्री व वित्तमंत्री हे देवेंद्रजीच असल्याने तेच आपल्या मागण्या पूर्ण करतील. 
        तसेच पोलीस पाटील यांच्या समस्यांची जवळून जाणीव असल्याने केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून नव्हे तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून या अधिवेशनात ठोस निर्णय घेण्यासाठी तसेच इतर मागण्यांबाबत मा.देवेंद्रजी फडणवीस यांची बैठक घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील आश्वासन यावेळी आ.चव्हाण यांनी दिले.

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क साधा
संपादक एस डी पाटील -9975405488

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व