Breaking चाळीसगाव- १६ पैकी १४ ग्रा.पं.वर भाजपाचा तर ८ ग्रा.पं.वर राष्ट्रवादी चा दावा

चाळीसगाव प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चाळीसगाव तालुक्यातील एकुण १६ ग्रामपंचायत पैकी २ बिनविरोध सह १४ ग्रामपंचायत वर आ.मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने यश मिळवले असून लोकनियुक्त संरपंचांसह सर्व सदस्य देखील भाजपाचे निवडून आलेले आहेत असा दावा चाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
       दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी जसजसा निकाल जाहीर करत होते तसे सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्ते हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात एकत्र येऊन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह जल्लोष साजरा करतांना दिसत होते.यावेळी आ.चव्हाण यांच्या धर्मपत्नी व शिवनेरी फाऊंडेशन अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार केला.

आता बनवू ग्रामविकासाचा पॅटर्न निराळा- आ.मंगेश चव्हाण
उडवला विजयाचा "धुराळा"..आता बनवू ग्रामविकासाचा पॅटर्न "निराळा"..
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण १६ पैकी १४ ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर यश मिळवले आहे. 
सर्व विजयी सरपंच व उमेदवारांचे अभिनंदन..!
      ज्या ताकदीने आपण विजयाचा "धुराळा" उडवला त्यापेक्षा जास्त वेगाने भाजपा - सेना युती सरकारच्या माध्यमातून सर्वाना हेवा वाटेल असा आपल्या गावाच्या ग्रामविकासाचा पॅटर्न "निराळा" तयार करूया..!
- आमदार मंगेश रमेश चव्हाण



राष्ट्रवादीचा देखील आठ ग्रामपंचायतींवर दावा?
दरम्यान भारतीय जनता पार्टी तर्फे उघडपणे दावा केला जात आहे की १६ पैकी बिनविरोध सह १४ ग्रामपंचायतीत आमच्या पक्षाने बाजी मारली असल्याचे सांगितले आहे व जवळपास त्या सगळ्या विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार देखील भाजप कार्यालयात करण्यात आल्याचे बघायला मिळाले.
      पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील तालुक्यातील १६ पैकी ०८ ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी ची सत्ता आली असल्याचे सांगितले आहे व सोशल मीडिया वर तसा दावा देखील राष्ट्रवादी समर्थकांच्या वतीने करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक जरी पक्ष चिन्हावर लढवली जात नाही परंतु तरीदेखील या निवडणुकीत विविध पक्षांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष सहभागी असतात त्यामुळे या निवडणुका देखील आता राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जातात.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व